ED च्या हाती महत्वाचे पुरावे : अलिबागमधील १० प्लॉटच्या व्यवहारावरुन राऊतांच्या अडचणीत वाढ

तीन कोटी रुपये रोख रक्कम देऊन राऊत यांनी अलिबागमध्ये १० ठिकाणी जमीन खरेदी केली असल्याची माहिती समोर आली आहे.
sanjay raut
sanjay rautsarkarnama

मुंबई : खासदार आणि शिवसेनेचे प्रवक्ते संजय राऊत (Sanjay Raut) सध्या ईडीच्या (ed) कोठडीत आहेत. आज त्यांची कोठडी संपत आहे. त्यामुळे राऊत यांना पुन्हा एकदा आज कोर्टात हजर केले जाणार आहे. त्यांच्या कोठडीत वाढ होते, की त्यांना जामीन मिळतो, हे दुपारी समजेल. (Sanjay Raut ed news update)

मुंबईच्या गोरेगावमधील पत्राचाळ प्रकरणी राऊत ईडीच्या कोठडीमध्ये आहे. चौकशी दरम्यान ईडीच्या हाती महत्वाची हाती अनेक महत्वाचे पुरावे हाती लागले आहेत. ईडीच्या हाती लागलेल्या कागदपत्रांच्या आधारे ईडीच्या अधिकाऱ्यांनी केलेल्या खुलाश्यानुसार तीन कोटी रुपये रोख रक्कम देऊन राऊत यांनी अलिबागमध्ये १० ठिकाणी जमीन खरेदी केली असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे राऊतांच्या अडचणी वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

sanjay raut
Shiv Sena Crisis : सत्तासंघर्षावर आज 'सुप्रीम' सुनावणी : काय होणार ? संपूर्ण राज्याचं लक्ष

एएनआय या वृत्तसंस्थेनं ही माहिती दिली आहे. राऊत यांच्या खात्यावर पैसे वळवण्याबरोबरच त्यांना प्रवीण राऊत यांच्याकडून मोठ्या प्रमाणात पैसे मिळाले होते. हाच पैसा संजय राऊत यांनी अलिबाग आणि मुंबईत फ्लॅट घेण्यासाठी वापरल्याचा दावा ईडीने केला आहे.

प्रवीण राऊत यांना म्हाडाच्या पत्रा चाळ पुनर्विकासाची परवानगी संजय राऊत यांच्यामुळेच मिळाली. या व्यवहारात संजय राऊतांना मोठी रक्कम मिळाली का या दिशेने ईडीनं सध्या तपास करीत आहे. आज न्यायालयात या मुद्दावरुन राऊतांना आणखी कोठडी वाढवून मिळावी, यासाठी ईडीकडून न्यायालयात मागणी केली जाऊ शकते.

एएनआयच्या माहितीनुसार..

  1. राऊतांशी संबंधित मुंबईत दोन ठिकाणांवर केलेल्या छापेमारीमध्ये महत्वाची कागदपत्रं हाती लागल्याचा दावा ईडीने केला आहे.

  2. तपासामध्ये राऊतांनी तीन कोटी रुपये रोख रक्कम देऊन अलिबागमध्ये १० प्लॉट विकत घेतले.

  3. एचडीआयएलच्या अकाऊटंटचाही जबाब नोंदवण्यात आला आहे.

  4. एचडीआयएलच्या माध्यमातूनच हे व्यवहार झाल्याचं सांगितलं जात आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com