Criticism On Sanjay Raut: संजय राऊत हे मुस्लिम लीगचे प्रवक्ते; कुणी केली टीका?

Bjp On Sanjay Raut: संजय राऊतांना मुस्लिमांबद्दल प्रेम...
Sanjay Raut
Sanjay RautSarkarnama

Mumbai News : मागील काही काळापासून शिवसेना ठाकरे गटाचे नेते व खासदार संजय राऊत यांच्यावर भाजप आमदार नितेश राणे यांच्यात आरोप- प्रत्यारोप करत आहेत. राऊत यांच्या प्रश्नांना, त्यांच्या आरोपांना प्रत्युत्तर देण्याची जबाबदारी नितेश राणे यांच्यावर सोपवली आहे. आता नाशिक येतील त्र्यंबकेश्वर मंदिरात घुसखोरीवरून आरोप प्रत्यारोप होत आहेत.

Sanjay Raut
Uddhav Thackeray News :जिल्हाप्रमुखांच्या बैठकीपूर्वीच ठाकरे गटाला पुण्यात मोठं खिंडार,महेश पासलकरांचा शिवसेनेत प्रवेश

संजय राऊत म्हणाले की, "मंदिरात कुणी घुसल्याची माझ्याकडे माहिती नाही. मंदिर प्रशासनावर दबाव आणून अशा प्रकारचं पत्र त्यांना द्यायला लावलं. काही जण मंदीराच्या परिससरात धूप दाखवून जात होते, ही त्यांची परंपरा आहे. त्यानुसार हे झालं आहे. या परंपरा सर्वत्र आहेत, असे राऊत म्हणाले."

यावर प्रत्युत्तर देताना नितेश राणे म्हणाले की, "महाराष्ट्रात दंगल कशी घडवायची, कुठे घडवायची? रझा अकादमीसाऱख्या लोकांना हाताला धरून, प्रयत्न शिवसेना ठाकरे गट करत आहे.संजय राऊत हे मुस्लीम लीगचे प्रवक्ते आहेत. मुस्लिम सामाजाच्या ते प्रेमात आहेत. मंदीर परिसरात मांसाहाराची दुकाने कशी चालतात. हे संजय राऊत सांगतात की, अधिकाऱ्यांनी सरकारी आदेश पाळू नका, उठाव करा. राज्य अस्थिर करणाच्या प्रयत्न राऊत करतात, असा हल्लाबोल नितेश राणेंनी केला.

Sanjay Raut
Sanjay Raut News : खासदार राऊत यांना दिलासा, अंतरिम जामीन मंजूर!

काय आहे प्रकरण?

त्र्यंबकेश्वर शहरातील (Trimbakeshwar Temple) त्र्यंबकेश्वर मंदिरात काही लोकांनी बळजबरीने प्रवेश करण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली असल्याची मंदीर प्रशासनाने पत्राद्वारे सांगितलं आहे.यानंतर देवस्थानने पोलिसांना पत्र पाठवत घटनेच्या चौकशीची मागणी केली होती. आता या घटनेची दखल घेत उपमुख्यमंत्री गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एफआयआर नोंदवून कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. या प्रकरणी आता नाशिकमध्ये पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com