Sanjay Raut News : राज्यात 'मुका घ्या मुका' कार्यक्रम सुरू ; राऊतांची खोचक टिपण्णी!

Sheetal Mhatre Viral video : "खोक्यावाल्यांच्या संपत्तीचा हिशोब घ्या.."
Sanjay Raut News : Sheetal Mhatre Viral video : Mumbai News :
Sanjay Raut News : Sheetal Mhatre Viral video : Mumbai News : Sarkarnama

Mumbai News : माजी नगरसेविका आणिमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या (Eknath Shinde) शिवसेना नेत्या शितल म्हात्रे यांचा एक कथित व्हिडिओ व्हायरल झाला होता. या प्रकरणाने राज्याचे राजकारण ढवळून निघाले होते. या व्हिडीओ प्रकरणात शिंदे गट आणि ठाकरे गटामध्ये जोरदार जुंपली होती. या व्हिडीओ व्हायरल प्रकरणी ठाकरे गट तसेच काँग्रेसच्या काही कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली होती. यावर आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

Sanjay Raut News : Sheetal Mhatre Viral video : Mumbai News :
Budget Live : मंत्र्यांच्या अनुपस्थितीवरून अजितदादा चिडले ; फडणवीसांची दिलगिरी ; "जनाची नाही तर मनाची.."

याबद्दल भाष्य करत संजय राऊत खोचक टोला लगावला आहे. मुंबईत मुका घ्या मुकाचे कार्यक्रम सुरू झाली असल्याची खोचक टीका राऊतांनी केली. यामुळे या प्रकरणी पुन्हा टिका टिपण्णी सुरू होण्याची शक्यता आहे.

काय म्हणाले खासदार संजय राऊत?

"राज्यात सद्या 'मुका घ्या मुका' कार्यक्रम सुरू आहे. आमच्या नेत्यांना अटक का केली जात आहे? पहिले गुन्हेगार तर सुर्वे आहेत, त्यांच्या मुलाला अटक का केली नाही? असा प्रश्न संजय राऊत यांनी विचारला. तसेच, 'आम्ही मुका घ्यायला सांगितला होता का," अशी खोचक टिपण्णीही संजय राऊत यांनी केली आहे.

Sanjay Raut News : Sheetal Mhatre Viral video : Mumbai News :
Shirur News : ठाकरेंना पुन्हा धक्का : दिवंगत आमदार गोरे कुटुंबियांचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश!

विरोधी पक्षांना लक्ष्य केले जात आहे..

"ठाकरे परिवार, आमचे कार्यरकर्ते, सहकारी यांच्यावर खोटेनाटे गुन्हे नोंदवले जात आहेत. संपत्तीचा विषय असो, व्हायरल व्हिडिओचा विषय असो, फक्त शिवसेना आणि ठाकरे परिवाराला यांना लक्ष्य करून राजकारण केलं जात आहे. खरंतर खोके वाल्यांच्या संपत्तीचा हिशोब मागायला हवा, पण ते आमच्याकडूनच संपत्तीचा हिशोब मागत आहेत," असे राऊत म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com