MP Sanjay Raut
MP Sanjay RautSarkarnama

Sanjay Raut : शिंदेंच्या दावोस किस्स्यावरून संजय राऊतांनी उडवली खिल्ली; म्हणाले...

Sanjay Raut : ''मुख्यमंत्री दावोसला गेले होते पण...

Sanjay Raut : बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त मुंबईसह राज्यात विविध कार्यक्रमांचे ठाकरे गटाकडून आयोजन करण्यात आले. याच पार्श्वभूमीवर मुंबईत आज षन्मुखानंद सभागृहात शिवसेनेच्या ठाकरे गटाच्यावतीने मेळावा आयोजित करण्यात आला.

यावेळी उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांनी शिवसैनिकांना संबोधित केले. संजय राऊत (Sanjay Raut) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी दावोस दौऱ्यातील सांगितलेला किस्सा सांगत खिल्ली उडवली.

राऊत म्हणाले की, ''दुसरी शिवसेना (ShivSena) या महाराष्ट्रात तयार होऊ शकत नाही. मुर्तीचोर कधी मंदीर बांधू शकत नाही. शिवसेना म्हणलं की फक्त बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरे हेच आठवतात. शिंदे मिंदे काही नाही. आपले मुख्यमंत्री दावोसला गेले होते. पण ते दावोस आपल्यासारख्याला माहित नाही. आपल्याला दापोली माहित आहे'', असं म्हणत त्यांनी शिंदेंना टोला लगावला.

MP Sanjay Raut
Kasba By-Election : काँग्रेस कसबा मतदारसंघाची पोटनिवडणूक लढवणार का? नाना पटोलेंनी स्पष्टच सांगितलं...

ते पुढे म्हणाले, ''मुख्यमंत्री दावोसला गेले तेथे बसले. पण तेथे आलेल्या गोऱ्या लोकांशी बोलायचे कसे? पण त्यांना कोणीतरी सांगितलं हे लक्झंबर देशाचे पंतप्रधान आहेत. त्यानंतर ते म्हणाले आरे तुम्ही येथे? किती खोके देऊ तुम्हाला? कारण सगळेच त्यांच्या पक्षात चाललेत. मग ते म्हणाले नाही नाही मला खोके वैगेरे नको. तुम्ही मोदींचे माणूस आहात मी पण मोदीचाच माणूस आहे. मग त्यांनी एक सेल्फी काढला. ते म्हणाले हा फोटो मोदींना दाखवा असं तेथे घडले असेल'', असं सांगत राऊतांनी शिंदेंवर प्रहार केला.

MP Sanjay Raut
बाळासाहेब ठाकरेंच्या तैलचित्र अनावरण कार्यक्रमास उद्धव ठाकरे गैरहजर

''आत्ता षन्मुखानंद सभागृहाबाहेर तीन चार गोरे लोक मला भेटले. ते म्हणाले मी पोलोन्डचा पंतप्रधान आहे. दुसरा म्हणाला मी बेल्जियमचा पंतप्रधान आहे. तर तिसरा म्हणाला मी पंतप्रधान आहे पण उद्धव ठाकरे यांचे भाषण ऐकायला इकडे आलोय. आम्ही ठरवलं की उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचे भाषण ऐकायचे. त्यामुळे आम्ही आलो. आरे पण लक्झंबरचे पंतप्रधान तिकडे गेले त्यांना जाऊद्या ते खरे पंतप्रधान नाहीत'', असं सांगत संजय राऊत यांनी मुख्यमंत्री शिंदेची खिल्ली उडवली.

MP Sanjay Raut
Shivsena News: खैरे, दानवे मुंबईत, तर शिंदे गटाकडून शहरात जोरदार शक्तीप्रदर्शन..

शिंदेनी दावोस दौऱ्याला काय किस्सा सांगितला होता?

मुंबईच्या दौऱ्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) आले होते. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाषण केले होते. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दावोस दौऱ्यामधील एक किस्सा सांगितला होता. शिंदे म्हणाले होते की, ''मी दावोसला गेलो होतो तेव्हा तिथे मोदींचा डंका वाजताना दिसला. दावोसमध्ये मला अनेक लोक भेटले, विविध देशातले लोक भेटले. अनेक देशांचे प्रधानमंत्री होते. अध्य़क्ष व विविध देशांचे मंत्री भेटले. ते मला मोदींबद्दलच विचारायचे. मोदींबद्दल चौकशी करायचे.

''मला लक्झंबर या देशाचे प्रधानमंत्री भेटले. ते मला म्हणाले की, 'मी नरेंद्र मोदींचा भक्त आहे. यांनंतर त्यांनी माझ्यासोबत फोटो काढला आणि म्हणाले हा फोटो मोदींना दाखवा'', असं शिंदे म्हणाले. तसेच ''जर्मनी देशाचे काही लोक भेटले, सौदीचे काही लोक भेटले म्हणाले, 'तुम्ही मोदींसोबत आहे ना," मी म्हणालो, मी मोदींचाच माणूस आहे. मोदींचा डंका आपला देशात वाजतोय पण, परदेशातही जोरदार वाजतोय'', असे शिंदे म्हणाले होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com