Sanjay Raut : संजय राऊतांचा हक्कभंग समितीलाच इशारा : तर तुम्हीच अपात्र ठराल...

Thackeray group : खासदार संजय राऊतांनी पत्रात काय म्हटलं?
Sanjay Raut
Sanjay Raut Sarkarnama

Mumbai News : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर टीका करताना विधिमंडळ नव्हे हे चोरमंडळ आहे, असं वक्तव्य केलं होतं. त्यानंतर राज्यात नव्या वादाला तोंड फुटलं होतं. या वक्तव्यव्यावरून राऊतांवर जोरदार टीकाही झाली होती.

राऊतांनी केलेल्या वक्तव्यानंतर सरकारकडून हक्कभंग समितीची स्थापन करण्यात आली होती. त्यानंतर राऊतांना हक्कभंगाची नोटीस बजावण्यात आली होती. मात्र, मध्यंतरी राऊत या नोटीसीबाबत काहीच बोलले नव्हते. पण आज संजय राऊतांनी हक्कभंग नोटीसीला उत्तर दिलं आहे.

Sanjay Raut
ZP School : जेवनाळ्यातील तरुणांनी सुरू केली जिल्हा परिषदेची शाळा !

त्यांनी विधिमंडळाच्या प्रधान सचिवांना पत्र लिहिलं आहे. या पत्रामध्ये त्यांनी हक्कभंग समितीतील सदस्यांवरच आक्षेप घेतला आहे. तसेच विधिमंडळाची अप्रतिष्ठा होईल, असं वक्तव्य मी केलंच नाही, असंही म्हटलं आहे.

काय आहे संजय राऊतांच पत्र?

''विधिमंडळाबद्दल मला सदैव आदर आहे. विधिमंडळाची अप्रतिष्ठा होईल, असं कोणतच विधान मी केलं नाही. मात्र, तरी देखील माझ्याविरोधात हक्कभंगाची कारवाई करणं हा विरोधकांचा डाव आहे. माझी त्याला काही हरकत नाही. पण माझं विधान काय होतं हे एकदा पहावं''.

''आम्हाला सगळी पदं माननीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी दिली आहेत. त्यांनी शिवसेना निर्माण केली. सध्याचं डुप्लिकेट शिवसेनेचं मंडळ हे विधिमंडळ नसून चोरमंडळ आहे, असं माझं (संजय राऊत यांच) विधान होतं, असं ते म्हणाले. म्हणजे मी विधिमंडळाला चोरमंडळ म्हटलं नसून मी केलेला तो उल्लेख एका फुटीर गटापुरता होता.

मात्र, यातीलच काही सदस्यांवर सर्वोच्च न्यायालयात खटला सुरू आहे. तर त्यातील काही जण हक्कभंग समितीचे सदस्यही आहेत. त्यामुळे न्यायालयाच्या निर्णयानंतर हक्कभंग समिती घटनाबाह्य ठरु शकते'', असे प्रतिउत्तर संजय राऊतांनी हक्कभंग समितीला दिले आहे.

Sanjay Raut
MLA Gaikwad : संपकऱ्यांनी आमदार संजय गायकवाडांचा प्रतीकात्मक पुतळा जाळला !

दरम्यान, हक्कभंगाच्या नोटीसीला उत्तर देत संजय राऊतांनी आपलं म्हणण मांडलं आहे. आता हक्कभंग समिती यावर काय भूमिका घेणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com