Sanjay Raut : संजय राऊतांच्या अडचणीत वाढ; पुन्हा अटकेची टांगती तलवार; काय आहे प्रकरण? वाचा...

Sanjay Raut : पत्राचाळ प्रकरणात ईडीने अटक केल्यानंतर काही दिवसांपूर्वीच राऊत हे तब्बल 110 दिवसांनी तुरुंगाबाहेर आले होते.
Shivsena leader Sanjay Raut
Shivsena leader Sanjay RautSarkarnama

ठाकरे गटाचे खासदार व नेते संजय राऊत पुन्हा एकदा अडचणीत आले आहेत. त्यांच्यावर पुन्हा एकदा अटकेची टांगती तलवार आहे. पत्राचाळ प्रकरणात ईडीने अटक केल्यानंतर काही दिवसांपूर्वीच राऊत हे तब्बल 110 दिवसांनी तुरुंगाबाहेर आले होते. यानंतरही राऊतांची केंद्रातील भाजप सरकार आणि राज्यातील शिंदे फडणवीस सरकारवर टीकेची तोफ थांबलेली नाही. मात्र, हेच संजय़ राऊत पुन्हा चौकशीच्या फेर्यात अडकण्याची शक्यता आहे. (Sanjay Raut Latest News)

आता बेळगाव न्यायालयाने राऊतांना बेळगावात ३० मार्च २०१८ रोजी प्रक्षोभक भाषण केल्याप्रकरणी समन्स बजावले आहेत. येत्या १ डिसेंबर रोजी न्यायालयात हजर राहण्याचे आदेश बेळगाव न्यायालयाने दिले असून हजर न झाल्यास त्यांना अटक होण्याची शक्यता आहे. मात्र, या समन्सवरुन संजय राऊतांनी देखील मोठा गौप्यस्फोट केला आहे.

Shivsena leader Sanjay Raut
पंजाबप्रमाणे गुजरातमध्ये देखील केजरीवालांचं भाकीत खरं ठरणार का?, कागदावर दिलं 'हे' लिहून

संजय राऊत (Sanjay Raut) यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना बेळगाव न्यायालयाने समन्सवर भाष्य केलं आहे. राऊत म्हणाले, अटकेच्या कारवाईला मी घाबरत नाही. मग ती कारवाई कर्नाटक सरकारची असो वा इतर कुणाची, मला फरक पडत नाही. आणि कर्नाटकला जाताना तर मी लपूनछपून नाही तर शिवसैनिकांच्या मोठ्या संख्येसह कोल्हापूर मार्गे बेळगावला जाईल. पण २०१८ साली केलेल्या भाषणात आक्षेपार्ह असं नेमकं काय होतं, तेच मला कळलं नाही असं राऊत म्हणाले.

Shivsena leader Sanjay Raut
Bhagat Singh Koshyari : राज्यपाल आपल्या राज्यात परत जाणार? राजभवनाकडून 'हे' स्पष्टीकरण

तसेच कर्नाटक सरकार मला बेळगावात बोलवून अटक करण्याची शक्यता आहे. मी न्यायालयात गेल्यावर माझ्यावर हल्ला होईल ही माझी माहिती आहे. बेळगाव न्यायालयात गेल्यावर मला अटक करावी आणि मला तिकडे बेळगावच्या तुरुंगात टाकावं अशा प्रकारचं कारस्थान सुरू असल्याचं माझ्या कानावर आलं असल्याचा गौप्यस्फोट देखील संजय राऊतांनी केला आहे.

राऊत पुढे म्हणाले, कर्नाटकचे मुख्यमंत्री बोम्मई यांनी महाराष्ट्रातील सोलापूर आणि सांगलीतील काही गावांवर दावा ठोकत ते कर्नाटकाला जोडण्याबाबत वक्तव्य केलं आहे. त्यांनी या विषयाला आधी तोंड फोडलं. पण महाराष्ट्राचा स्वाभिमान म्हणून आम्ही लढा देत आहोत. त्यामुळे आम्हाला कायदेशीर बाबींमध्ये गुंतवणे, बेळगावात बोलवून हल्ले करणे असं कारस्थान शिजताना मला दिसतंय. याची दखल महाराष्ट्र सरकारने घ्यायला हवी. शिवसेनेनं सीमाप्रश्नासाठी 69 हुतात्मे दिले आहेत. सत्तरावा हुतात्मा होण्यास मी तयार असल्याचं देखील राऊतांनी यावेळी ठामपणे सांगितलं.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com