साहेबांसाठी आम्ही लाठ्याकाठ्या झेलायच्या आणि राउतांनी मात्र, राणांच्या पंगतीत बसून पेटपूजा करायची!

'मातोश्री'लाच आव्हान दिल्याने राणांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर उतरले आणि राडाही झाला.
Sanjay Raut & Ravi Rana, Navneet Rana Latest News
Sanjay Raut & Ravi Rana, Navneet Rana Latest News Sarkarnama

मुंबई : भारतीय जनता पक्षाची (BJP) ताकद घेऊन थेट शिवसेनेचे पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना (Uddhav Thackeray) 'चॅलेंज' करणारे आमदार रवी राणांसोबत (Ravi Rana) शिवसेनेचे फायरब्रॅण्ड नेते, खासदार संजय राऊत (Sanjay Raut) हे लेह-लडाख (Leh Ladakh) येथे जेवण करताना दिसून आले आणि शिवसेनेच्या (Shivsena) गोटात प्रचंड खळबळ माजली आहे.

'साहेबांसाठी आम्ही लाठ्याकाठ्या झेलायच्या आणि राउतांनी मात्र, राणांच्या पंगतीत बसून पेटपूजा करायची, असा प्रश्न शिवसेनेच्या वर्तुळातून विचारला जात आहे. राऊतांच्या मनात आहे तरी काय, असा खोचक सवालही शिवसैनिक विचारत आहेत. त्यामुळे भाजपवर तुटून पडत, शिवसेना आणि ठाकरेंची रोजच पाठराखण करणारे राऊत आता शिवसैनिकांच्या मनात उतरत असल्याचे सोशल मीडियावरील मेसेजवरून दिसत आहे. (Sanjay Raut & Ravi Rana, Navneet Rana Leh-Ladakh Latest Marathi News)

Sanjay Raut & Ravi Rana, Navneet Rana Latest News
बृजभूषण सिंह लढवय्या माणूस, ते मागे हटणार नाही; राऊतांनी राज ठाकरेंना पुन्हा डिवचले...

हनुमान चालिसावरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राणा दांपत्यांमधील वादाने टोक गाठले. थेट मातोश्रीलाच आव्हान दिल्याने राणांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर उतरले आणि राडाही झाला. त्यातून राणा दांपत्यांना तुरुंगवारी करावी लागली, तरीही राणांचा बाणा शिवसेनेविरोधातच राहिला. या घटनेत अनेक शिवसैनिकांविरोधात गुन्हेही दाखल झाले आहेत. तरीही राणांना जशास तसा धडा शिकविण्याचा कार्यकर्त्यांचा इरादा कायम राहिला. त्यातून शिवसेना, ठाकरेंचे शक्तीप्रदर्शन झाले आणि राणा 'बॅकफूटवर गेल्याचे चित्रही निर्माण झाले. मात्र, शिवसेना आणि ठाकरेंविरोधातील लढाईवर ठाम राहिलेले आमदार रवी राणांसोबत जेवण करताना राऊत यांचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि राऊत हे स्वपक्षीयांच्या टीकेचे धनी ठरले आहे.

दरम्यान, याच संघर्षाच्या पार्श्वभूमीवर आता खासदार राऊत आणि खासदार राणा हे दोघेही एकाच वेळी लेह दौऱ्यावर गेले आहेत. संसदेच्या परराष्ट्र व्यवहार समितीच्या अभ्यास दौऱ्यावर हे दोन्ही खासदार गेले आहेत. या दौऱ्यात रवी राणा आणि राऊत हे एकत्रित जेवण करताना तर काही दृश्यांमध्ये गप्पा मारतानांही दिसत आहेत. यावरून सोशल मीडियावर राऊतांना चांगलच ट्रोल केल जात आहे.

Sanjay Raut & Ravi Rana, Navneet Rana Latest News
Aurangabad : उद्धव ठाकरेंच्या मास्टर सभेआधीच, फडणवीस मास्टर स्ट्रोक लगावणार..

काही दिवसांपुर्वी राऊत यांनी खासदार नवनीत राणा यांच्यावर गंभीर आरोप केले होते. राणा यांनी अंडरवर्ल्डशी संबंधित असलेल्या युसूफ लकडावाला याच्याकडून पैसे घेतल्याचा त्यांनी आरोप केला होता. तर नवनीत राणा यांनी राऊत यांच्यावर अॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करावा, अशी मागणी दिल्ली पोलिसांकडे केली होती. याबाबतचे पत्रही त्यांनी दिले होते. राऊतांनी आपल्याला 420 म्हणत बदनामी केली म्हणत नवनीत राणा यांनी म्हटलं होतं. याचबरोबर राणा दांपत्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर देखील अनेकदा गंभीर आरोप केलेले आहेत. या पार्श्वभूमीवर राऊत आणि राणा दांपत्य एकत्र दिसल्याने चर्चेला ऊत आला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in