'देशाच्या राजकारणातील सगळ्यात मोठी चूक म्हणजे संजय राऊतांना अटक केली!'

Sanjay Raut Latest News : शिवसेनेचे १०३ आमदार निवडणून येतील, राऊतांचा निर्धार
Sanjay Raut Latest News
Sanjay Raut Latest NewsSarkarnama

Sanjay Raut Latest News : कथीत पत्राचाळ गैरव्यवहार प्रकरणी शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) (Shivsena) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांना तब्बल १०० दिवसानंतर जामीन मिळाला आहे. त्यांना पीएमएलए कोर्टाने जामीन मंजूर केला. राऊत हे तुरुगांतून बाहेर आल्यानंतर शिवसैनिकांनी त्यांची मोठी रॅली काढली. राऊत आपल्या भांडुप येथील निवासस्थानी पोहचल्यानंतर त्यांनी शिवसैनिकांशी संवाद साधला. या वेळी त्यांनी विरोधकांवर तोफ डागली.

राऊत म्हणाले, मी उद्यापासून कामाला लागणार आहे. मी सगळ्यांचा आभारी आहे. न्यायदेवतेचे आभार मानतो. संपूर्ण देशात शिवसेना ही एकच आहे आणि ती म्हणजे बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे यांची आहे. मी राजकीय सुडाचा बळी ठरलो. मरन पत्कारीन पण शरण जाणार नाही, असे मी सांगितले होते, असेही राऊत म्हणाले.

Sanjay Raut Latest News
आदित्य ठाकरेंनी शहाजीबापूंचं वाढवलं टेन्शन ..आबांचं नावं घेत म्हणाले..

शिवसेना तुटलेली नाही. मशाल पेटलेली आहे. देशाच्या राजकाणातील सगळ्यात मोठी चुक म्हणजे मला अटक केली. न्यायालयाने सांगितले संजय राऊत यांची कोणतीच चूक नाही. गद्दारांना बाळासाहेब ठाकरे यांचे नाव घेण्याचा अधिकार नाही. मुंबई महापालिकेकडे लक्ष असेलच. १०३ दिवस तुरुंगात होतो, त्यामुळे १०३ आमदार निवडूण आणार, असल्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केली.

Sanjay Raut Latest News
कारागृहाबाहेर पडल्यावर राऊतांची शिवसेना स्टाईलमध्ये पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...

शंभर दिवसानंतरही जनता मला विसरली नाही. पुढचा मुख्यमंत्री आपल्याच शिवसेनेचा होणार आहे. राज्यातील बोके खोक्यात बसलेत आहेत, असा घणाघात त्यांनी शिंदे गटातील आमदारांवर केला. मला चिडणं संपवन इतकं सोपं नाही, असा इशाराही राऊत यांनी दिला. मला माहित होते शिवसैनिक माझी वाट बघतोय, आता सुटलो आहे. आता सुसाट सुटायचे आहे

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in