संजय राऊतांना ईडीने अटक केलेली नाही : आमदार सुनील राऊतांनी दिली महत्वपूर्ण माहिती

या चौकशीत काहीही मिळालेले नाही, असे संजय राऊत यांचे बंधून सुनील राऊत यांनी यावेळी बोलताना सांगितले.
Sanjay Raut
Sanjay Raut Sarkarnama

मुंबई : शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांना ईडीकडून (ED) अद्याप अटक करण्यात आलेली नाही, असे त्यांचे बंधू आणि शिवसेनेचे आमदार सुनील राऊत (Sunil Raut) यांनी सांगितले. (Sanjay Raut has not been arrested by ED: MLA Sunil Raut)

सक्तवसुली संचनलयाकडून (ईडी) आज सकाळपासून खासदार संजय राऊत यांच्या मुंबईतील बंगल्यावर छापा टाकण्यात आला होता. सकाळपासून संध्याकाळी पाचपर्यंत संजय राऊत यांची चौकशी करण्यात आली. मात्र, या चौकशीत काहीही मिळालेले नाही, असे संजय राऊत यांचे बंधून सुनील राऊत यांनी यावेळी बोलताना सांगितले.

Sanjay Raut
अखेरपर्यंत लढणार! ताब्यात घेतल्यानंतर संजय राऊतांनी हात उंचावले... दंडही दाखवले...

या कारवाईसंदर्भात बोलताना आमदार सुनील राऊत पत्राचाळ प्रकरणातील कोणहीही कागदपत्रे ईडीला मिळालेली नाहीत. गैरव्यवहारसंदर्भात कोणतेही पुरावे ईडीला मिळालेले नाहीत. आज दिवसभर संजय राऊत यांनी तपासाला सहकार्य केलेले आहे. संजय राऊत यांना चौकशीसाठी ईडीच्या कार्यालयात नेण्यात आले आहे. त्या ठिकाणी चौकशी करण्यात येऊन संजय राऊत यांना सोडण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

Sanjay Raut
परभणीत शिवसेना अखेर फुटलीच : उपजिल्हाप्रमुख माणिक पोंढे यांचा शिंदे गटात प्रवेश

दरम्यान, शिवसैनिकांनी राऊत यांच्या घरासमोर मोठी गर्दी करत शक्तीप्रदर्शन केले. अनेक शिवसैनिकांनी संजय राऊत यांच्या गाडीसमोर आडवे झोपले होतेश अनेक शिवसैनिकांनी केंद्र सरकारच्या विरोधात घोषणाबाजी केली. भाजपचे लोक धुतल्या तांदळासारखे आहेत का, अशा प्रतिक्रिया शिवसैनिकांकडून येत होत्या.

Sanjay Raut
एकनाथ शिंदेंची पश्चिम महाराष्ट्रातील पहिली सभा पवारांच्या बालेकिल्ल्यात!

पत्राचाळ प्रकरणात ईडीने आतापर्यंत तीन वेळा खासदार राऊत यांना समन्स बजावले होते. मात्र, राऊत हे चौकशीला सहकार्य करत नसल्यामुळे ईडी आज त्यांच्या घरी चौकशीसाठी दाखल झाल्याचे सांगितले जाते. ईडीकडून राऊतांना काही दिवसांपूर्वी चौकशीसाठी नोटीस बजावली होती. मात्र, संसदेचे अधिवेशन असल्याचे सांगून राऊत ईडीच्या चौकशीला सामोरे गेले नव्हते. तसेच, त्यांनी ईडीकडून चौकशीसाठी मुदतवाढ मागवून घेतली होती. आज सकाळीच ईडीचे काही अधिकारी संजय राऊतांच्या घरी दाखल झाले. या अधिकाऱ्यांसह काही सुरक्षा रक्षकांनी राऊतांच्या घराबाहेर पहारा सुरू केला असून कुणालाही मध्ये येण्यास मज्जाव घालण्यात आला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com