शेतकऱ्यांना मालक करण्याचे नव्हे गुलाम करणारे कृषी कायदे

आगामी पंजाब (Punjab) आणी उत्तर प्रदेशच्या (Uttar Pradesh) निवडणुकीत पराभव होईल, या भीतीने निर्णय मोदी सरकारने कायदे रद्द करण्याचा निर्णय घेतला.
शेतकऱ्यांना मालक करण्याचे नव्हे गुलाम करणारे कृषी कायदे
Sanjay Raut

मुंबई : दीड वर्षांपासून शेतकरी तणावाखाली होता, त्या जोखडातून आज शेतकरी मुक्त झाला. कृषी कायदे हे शेतकऱ्यांना मालक करण्याचे नव्हे गुलाम करण्याचे कायदे होते, त्यांच्या जमिनींवर कब्जा करणारे कायदे होते. पण आज अखेर शेतकऱ्यांचा विजय झाला, असे म्हणत शिवसेना (Shivsena) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी कृषी कायदे (Agricultural laws) रद्द करण्याच्या निर्णयाबाबत आपली भाष्य केलं आहे.

- कृषी कायदे - शेतकऱ्यांनी लढून हे स्वातंत्र्य मिळवले आहे

आज सकाळी माध्यमांना दिलेल्या मुलाखतीत त्यांनी केंद्रीय कृषी कायदे रद्द करण्याचा निर्णयासंर्भात विचारले असता ते बोलत होते. '' पंतप्रधान नरेंद्र मोंदीनी शेतकऱ्यांच्या विरोधात जाऊन हे कायदे लागू केले होते, शेतकऱ्यांचं आंदोलन मोडून काढण्यासाठी अनेक प्रयत्न झाले. त्यांच्यावर लाठीचार्ज झाला, त्यांच्या अंगावर गाड्या घालून त्यांना चिरडले, गुंड पाठवले, जालियनवाला बागेत जसा हिंसाचार झाला, तसा हिंसाचार शेतकऱ्यांवर करण्यात आला. पण शेतकरी हटला नाही, शेतकऱ्यांनी लढून हे स्वातंत्र्य मिळवले आहे, भिकेतुन नाही, त्यासाठी ७०० शेतकऱ्यांनी बलिदानही दिलं आहे, असेही संजय राऊतांनी म्हटले आहे.

Sanjay Raut
रविकांत तुपकरांचे अन्नत्याग आंदोलन स्थगित

याशिवाय, उत्तर प्रदेश आणि पंजाबमध्‍ये भाजपला सात गमवावी लागेल, या भितीने त्‍यांनी कायदे मागे घेण्यात आले, असा टोलाही त्यांनी विरोधकांना लगावला. कायदे रद्द झाले ते सद्भभावनेने नाही, शेतकरी मागे हटायला तयार नाही, ज्या १३ राज्यांच्या पोट निवडणुकांमध्ये भाजपचा पराभव झाला. आता आगामी पंजाब आणी उत्तर प्रदेशच्या निडणुकीत पराभव होईल, या भीतीने निर्णय मोदी सरकारने कायदे रद्द करण्याचा निर्णय घेतला.

- विधान परिषद उमेदवारी

यावेळी संजय राऊतांना विधान परिषदेच्या उमेदवारीवर विचारले असता, ते म्हणाले की,रामदास कदम कडवट शिवसैनिक आहेत. तर सुनील शिंदे यांनी वरळीत आदित्य ठाकरेंसाठी जागा सोडली ते आमदार होते. त्यांनी ठाकरे परिवारावर दाखवलेल्या निष्ठेचं हे फळ मिळालं आहे, असंही त्यांनी सांगितलं, तर रामदास कदमांच्या ऑडिओ क्लिपवर बोलणार नाही ते आमदार मंत्री होते पक्षाचं नेतृत्व देखील आहे केलं, असं सांगत त्यांनी रामदास कदम यांच्यावर टिप्पणी करायाला नकार दिला.

- एसटी विलीनीकरण

एसटी कामगारांचे प्रश्न लवकरात लवकर सुटावेत, यासाठी राज्यसरकार प्रयत्न करत आहेत. परिवहन मंत्री दिवस रात्र यात लक्ष घालत आहेत. एसटी कर्माचाऱ्यांचे प्रश्न लवकरात लवकर सोडवण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत आणि काही प्रमाणत ते सोडवले देखील आहेत. पण त्यासाठी विलानीकरण हा एकच विषय राहायला असून हायकोर्टाचे काही निर्देश आहे, त्या नुसार ते काम करतील, असही संजय राऊतांनी सांगितलं.

- चंद्रकांत पाटलांनी स्वत:ची मानसिकता तपासावी

केंद्रसरकारने कृषी कायदे मागे घेतल्याने ज्याला दु:ख झाले असेल तर, माझा शोक संदेश त्यांना पाठवेल, त्यांच्यासाठी शोक असेल तर त्यांच्यासाठी शोक सभा घेऊ. पण जर देश उत्सव साजरा करत असेल तेंव्हा जर कुणाला शोक वाटत असेल तर मानसिकता तपासावी लागेल, असा खोचक टोलाही संजय राऊतांनी लगावला.

- कंगना राणावत आणि विक्रम गोखले म्हणतात ते स्वातंत्र्य नाही

कंगना राणावत आणि विक्रम गोखले यांची स्वातंत्र्याबाबतची व्याख्या वेगळी असेल, पण ते जे म्हणत आहेत ते, स्वातंत्र्य नाही.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in