
मुंबई : शिवसेना (Shivsena) नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासोबत गेलेल्या बंडखोर आमदारांना पुन्हा एकदा शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांना परत येण्याचे आवाहन केले आहे. चर्चेतून मार्ग निघू शकतो. आपल्यासाठी शिवसेनेचे दरवाजे उघडे आहेत. का उगाच वण वण भटकताय. गुलामी पत्करण्यापेक्षा स्वाभिमानाने निर्णय घेऊ, असे आवाहन राऊत यांनी ट्वीटरच्या माध्यमातून केले आहे. (Eknath shinde, sanjay raut Latest News)
आज बंडखोर गटांच्या ताब्यातून सुटलेल्या दोन आमदारांनी माध्यमांसमोर त्यांच्यावर आलेल्या संकटाची माहिती दिली. यावेळी "शिवसेनेने महाविकास आघाडीतून बाहेर पडावे अशी आमदारांची इच्छा असेल तर आमदारांनी 24 तासांत मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासमोर उपस्थित राहून चर्चा करावी," " बंडखोर आमदारांच्या मागणीचा विचार होईल. मात्र, त्याआधी तुम्ही मुंबईत येण्याची हिंमत दाखवा," असे आवाहन राऊतांनी केले होते. त्यांच्या या आवाहनानंतर बंडखोर गटाने शिवसेनेने आधी महाविकास आघाडीतून बाहेर पडावे, असा पवित्रा घेतला आहे. यामुळे शिवसेनेची मोठी कोंडी झाली आहे.
राऊत आपल्या ट्विटमध्ये म्हणाले, चर्चेतून मार्ग निघू शकतो. चर्चा होऊ शकते. घरचे दरवाजे उघडे आहेत. का उगाच वण वण भटकताय? गुलामी पत्करण्यापेक्षा स्वाभिमानाने निर्णय घेऊ, असे भावनिक आवाहन त्यांनी केले आहे.
दरम्यान, राऊत यांनी बंडखोरांना केलेल्या आवाहनावर कॅाग्रेसचे नेते आणि माजी मुख्यमंत्री यांनी प्रतिक्रिया दिली आहे. महाविकास आघाडीतून ते बाहेर पडणार असतील तर ते भाजपसोबत जाणार आहेत का, अधिकृतपणे उद्धवजी आपल्या वक्तव्यात असे काहीही बोलले नाहीत. गुहाटीला ४८ आमदार जमलेले पाहून त्यांच्या दबावाखाली येऊन शिवसेनेच्या प्रमुखांनी ही भूमिका घेतली आहे का. हे अजून स्पष्ट झालेले नाही. महाविकास आघाडीतून बाहेर पडून शिवसेना व मुख्यमंत्री भाजपसोबत जाणार का, दुय्यम भुमिका घ्यायला तयार आहेत का. त्यांचा अधिकृत प्रवक्ता कोण आहे, हेच समजायला तयार नाही, अशी आपली नाराजी व्यक्त केली.
ते पुढे म्हणाले की, काल उद्धवजी आपल्या वक्तव्यात असे काहीही बोलले नव्हते. यामुळे स्वतःची भूमिका काय आहे हे ठाकरे यांनी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून सांगितले पाहिजे. शिवसेना कोणासोबत आहे, हे त्यांनी सांगितले पाहिजे, असे मत व्यक्त केले आहे. आता राऊतांनी पुन्हा केलेल्या आवाहनाला बंडखोर आमदार काय प्रतिसाद देतात आणि राज्याच्या राजकारणात काय उलतापाथल होते हे बघणे महत्वाचे ठरणार आहे.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.