Rohit Pawar : वाघ पिंजऱ्यातून बाहेर..; रोहित पवारांचा व्हिडिओ व्हायरल

Rohit Pawar : दोन लाखांच्या जातमुचलक्यावर राऊतांना जामीन मंजूर झाला आहे.
sanjay raut granted bail news update
sanjay raut granted bail news updatesarkarnama

Rohit Pawar : गोरेगाव पत्राचाळ गैरव्यवहार प्रकरणी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना आज अखेर जामीन मिळाला आहे, 102 दिवसांनी पीएमपीएल कोर्टाने राऊतांचा जामीन मंजूर केला आहे. दोन लाखांच्या जातमुचलक्यावर राऊतांना जामीन मंजूर झाला आहे. राऊतांच्या जामीनावर महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या प्रतिक्रिया समोर येत आहेत. (sanjay raut granted bail news update)

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते, आमदार रोहित पवार यांनी राऊतांच्या जामीनानंतर एक व्हिडिओ शेअर केला आहे. पिंजऱ्यांतून वाघाची सुटका होत असल्याचे या व्हिडिओमध्ये दिसत आहे. यावरुन "वाघ अखेर पिंजऱ्यांतून बाहेर आला," असे रोहित पवार यांनी म्हटलं आहे, असे दिसते.

महाविकास आघाडीतील नेते, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खासदार सुप्रिया सुळे यांनीही राऊतांच्या जामीनावर आनंद व्यक्त केला आहे.

sanjay raut granted bail news update
Sanjay Raut : टायगर इज कम बॅक ! ; सुषमा अंधारेंचे टि्वट, ठाकरे गटाकडून जल्लोष

गोरेगावच्या कथित पत्राचाळ घोटाळा प्रकरणी ईडीने 31 जुलै रोजी राऊत यांना अटक केली होती. सुरुवातीला पोलिस कोठडी व त्यानंतर दोनदा संजय राऊत यांच्या न्यायालयीन कोठडीत वाढ झाली होती. त्यामुळे आज राऊत यांना जामीन मिळण्याची शक्यता होती. त्यानुसार अखेर राऊत यांना जामीन मिळाला.

sanjay raut granted bail news update
मोठी बातमी : Sanjay Raut शंभर दिवसानंतर कारागृहातून बाहेर येणार ; जामीन मंजूर

ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी टि्वट करीत राऊतांच्या जामीनावर प्रतिक्रिया दिली आहे. अंधारे यांनी टि्वट करीत राऊतांच्या जामीनावर आनंद व्यक्त केला आहे. एका वृत्तवाहिनीशी बोलतांना अंधारेंना अश्रू अनावर झाले. "टायगर इज कम बॅक," असे टि्वट सुषमा अंधारेंनी केलं आहे. राऊतांच्या जामीनाना ईडीनं विरोध केला आहे, यावर तीन वाजता सुनावणी होणार आहे. ईडी या निर्णयाविरोधात उच्चन्यायालयात जाणार असल्याची शक्यता आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in