Sanjay Raut : राऊतांच्या अटकेचे राज्यसभेतही पडसाद ; शिवसेना आक्रमक

केंद्रीय तपास यंत्रणेचा वापर सुडबुद्धीने केला जात असल्याचा आरोप महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांनी केला आहे.
sanjay raut
sanjay rautsarkarnama

नवी दिल्ली : शिवसेनेतेची मुलूखमैदान तोफ, खासदार संजय राऊत (sanjay raut)यांनी ईडीनं अटक केल्यानंतर आता शिवसेना आक्रमक झाली आहे. आज राज्यभर शिवसेनेकडून आंदोलन करण्यात येणार आहे. राऊतांच्या अटकेवर राज्यभरातून सत्ताधाऱ्यासह विरोधकांकडून प्रतिक्रिया येताना दिसत आहे. राऊत यांना ताब्यात घेतल्याचे पडसाद महाराष्ट्रातचं नाही तर संपूर्ण देशभरात उमटताना दिसत आहेत. (Sanjay Raut ED Enquiry latest news)

कॉंग्रेससह (Congress) राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून (NCP) शिवसेना खासदार संजय राऊत यांना पाठींबा दर्शवण्यात आला आहे. विविध नेत्यांकडून भाजपवर घणाघात करण्यात आला आहे. केंद्रीय तपास यंत्रणेचा वापर सुडबुद्धीने केला जात असल्याचा आरोप महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांनी केला आहे.

केंद्र सरकारकडून ईडी, सीबीआय आणि आयटी सारख्या प्रमुख तपास यंत्रणांचा गैरवापर केल्यासंबंधी शिवसेनेकडून राज्यसभेत कामकाजाच्या निलंबनाची नोटीस जारी करण्यात आली आहे. शिवसेना खासदार प्रियांका चतुर्वेदी यांनी राज्यसभेत कामकाजाच्या निलंबनाची नोटीस जारी केली आहे.

sanjay raut
Sanjay Raut : ईडीने जप्त केलेली रोकड अयोध्या दौऱ्यासाठी ; एकनाथ शिंदेंचेही नाव

काल तब्बल 9 तासांच्या चौकशीनंतर अंमलबजावणी संचालनालयाने (Enforcement Directorate) शिवसेना खासदार संजय राऊत (Shiv Sena MP Sanjay Raut) यांना ताब्यात घेतले आहे.

केंद्र सरकारकडून (Central Government) ईडी (ED), सीबीआय (CBI) आणि आयटी (IT) सारख्या प्रमुख तपास यंत्रणांचा गैरवापर केल्यासंबंधी शिवसेनेकडून राज्यसभेत कामकाजाच्या निलंबनाची नोटीस जारी करण्यात आली आहे. शिवसेना खासदार प्रियांका चतुर्वेदी (Priyanka Chaturvedi) यांनी राज्यसभेत कामकाजाच्या निलंबनाची नोटीस जारी केली आहे.

प्रियंका चतुर्वेदींनी काल संजय राऊत याच्यावरील ईडी कारवाईनंतर टि्वट केल होत ज्यात लिहलं आहे, तेरा ध्यान किधर है, फ्रॉड इधर है आणि याबरोबर एक्सप्रेस न्यूज सर्विस या वृत्तपत्राने स्मृती इराणीच्या मुलीबाबत छापलेलं वृत्त जोडण्यात आलं आहे. म्हणजे या टि्वट मधून खासदार प्रियंका चतुर्वेदींनी संजय राऊत यांना पाठींबाचं नाही तर थेट केंद्रीय मंत्री स्मृती इराणींवर हल्लाबोल केला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in