'शिंदे-फडणवीस सरकार कोसळणार? पडद्यामागे राजकीय भूकंपाची तयारी!'

Sanjay Raut News : राज्यातील शिंदे-फडणवीस सरकार लवकरच कोसळणार, खासदार संजय राऊत यांचा दावा
Eknath Shinde| Devendra Fadnavis
Eknath Shinde| Devendra Fadnavis Sarkarnama

Sanjay Raut News : राज्यातील शिंदे-फडणवीस सरकार लवकरच कोसळणार, पडद्यामागे राजकीय भूकंपाची तयारी होत आहे. रावसाहेब दानवे केंद्रीय मंत्री असल्यामुळे या हालचाली त्यांच्यापर्यंत गेल्या असतील, असे शिवसेने खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी म्हटले आहे. राऊत यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर निशाणा साधत पुन्हा एकदा खळबळ उडऊन दिली आहे.

त्यांच्या या विधानाची महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरु आहे. संजय राऊत यांनी मुंबईत माध्यमांशी संवाद साधला. या वेळी पत्रकारांनी त्यांना राज्यात पुढील दोन महिन्यांत काय होईल? असा प्रश्न विचारला. या प्रश्वाचे उत्तर देताना राऊत यांनी 'आम्ही राज्यात परिवर्तन घडवून आणण्याच्या कामाला लागलो आहोत', असे स्पष्ट सांगितले. राऊत यांनी हे विधान केल्याने राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली.

Eknath Shinde| Devendra Fadnavis
Gujrat Election : अमित शहाच म्हणतात, गुजरातमध्ये आजही काँग्रेसचा जनाधार!

'रावसाहेब दानवेंनी सांगितलं आहे, दोन महिन्यात काय होईल सांगता येत नाही. याचा अर्थ आमच्या हालचालीची बित्तंबबातमी त्यांना कळलेली दिसते. भूगर्भात ज्या हालचाली सुरू आहे, पडद्यामागे काही हालचाली सुरू आहेत, केंद्रीय मंत्री असल्याने त्यांच्या कानापर्यंत गोष्टी गेल्या असतील', असे त्यांनी स्पष्ट केले.

राऊत यांनी महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादावरही भाष्य केले. सध्या महाराष्ट्रात अत्यंत कमजोर आणि हतबल सरकार आहे. त्यामुळे महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद निर्माण होत असल्याचे वक्तव्य राऊत यांनी केले. कोणाला मुंबई तोडायचीय, कोणाला महाराष्ट्राचे जिल्हे आणि गावे तोडायचीत. गेल्या साडेतीन महिन्यापासून महाराष्ट्र कुरतडण्याचे काम सुरु असल्याचेचा हल्लाबोल राऊत यांनी केला.

Eknath Shinde| Devendra Fadnavis
Marathwada : भुमरेंच्या `नुसता इक्कास`ची अंधारेंनंतर रोहित पवारांकडूनही चिरफाड..

जर लवकरात लवकर राज्यातील सरकार घालवले नाही, तर या राज्याचे पाच तुकडे केल्याशिवाय केंद्र सरकार आणि त्यांचे हस्तक राहणार नाहीत, असा आरोप संजय राऊत यांनी केला. दरम्यान, दिशा सालियन प्रकरणात भाजप (BJP) नेत्यांनी आदित्य ठाकरेंची (Aditya Thackeray) ताबडतोब माफी मागावी, इतक्या तरुण नेत्यावर आरोप करताना तुम्हाला काहीच कसे वाटले नाही? असा संतप्त सवालही त्यांनी केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in