राजभवनात देशविरोधी कृत्ये: संजय राऊतांचा आरोप

INS Vikrant scam| Sanjay Raut |Kirit Somaiya| सोमय्या पिता-पुत्रांच्या विरोधात लुक आऊट नोटीस जारी करण्याची संजय राऊतांची मागणी
संजय राऊत
संजय राऊतसरकारनामा

मुंबई : सोमय्या पिता-पुत्रांनी सेव्ह विक्रांतच्या (INS vikrant) नावाखाली केलेला घोटाळा समोर येताच ते फरार झाले आहेत. घोटाळेबाज मेहुल चोक्सीप्रमाणे तेही देशातून पळून जाऊ शकतात, म्हणून त्यांच्या विरोधात पोलिसांनी लुकआऊट नोटीस जारी करायला हवी, अशी मागणी शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay raut) यांनी केली आहे.

आज सकाळी माध्यमांशी त्यांनी संवाद साधला, यावेळी ते बोलत होते. किरीट सोमय्या मुलासह फरारी झाला आहे. न्याय यंत्रणेवर दबाव आणुन सुटका करुन घेण्याच्या प्रयत्नात हे ठग आहेत. न्यायालयाची दिशाभूल करण्यासाठी त्यांनी बनावट कागदपत्र तयार केली तरी सत्याचाच विजय होईल. प्रश्न इतकाच की. हे दोन ठग कोठे आहेत? मेहुल चोकसी प्रमाणे पळून तर गेले नाहीत ना ? असा सवाल उपस्थित केला आहे.

संजय राऊत
भारती पवार म्हणाल्या, होमिओपॅथी डॉक्टरांच्या पाठीशी!

तसेच, सोमय्या यांच्या यांच्या घोटाळ्याचा तपास आता आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला आहे. भारतीय जनता पक्षाने सोमय्यांच्या या घोटाळ्यावर आणि त्यांच्या फरार होण्यावर अद्याप कोणतेही अधिकृत वक्तव्य का केले नाही. विक्रांत घोटाळ्याला भाजप सोमय्यांना समर्थन करत आहे का, देशाच्या नावाने झालेला हा घोटाळा आहे असेही त्यांनी विचारले आहे.

तसेच, राजभवनानेही या घोटाळ्यात पडू नये, माझ्या माहितीप्रमाणे राजभवनात माफिया टोळीची माणसं जात आहेत आणि जुन्या तारखेची बनावट कागदगपत्रे तयार करण्याचा प्रयत्न करत आहेत. असा आरोपही त्यांनी केला आहे.पण राज भवनाने अशा देशविरोधी कृत्यात सहभागी होऊ नये, असा इशाराही त्यांनी दिला आहे.

किरीट सोमय्यांचा पीएमसी बॅंक घोटाळ्यातील राकेश वाधवान यांच्याशीही संबंध आहेत. त्यांनी देशातूनच नाही तर देशाबाहेरुनही पैसे गोळा केलेत. त्यांची एक माफिया टोळीही आहे जे सामान्य लोकांकडून आणि मोठमोठ्या बिल्डरांकडून पैसे गोळा करत आहेत. आताही सोमय्या पिता पुत्र फरार आहेत आणि चौकशीला हजर न राहत अटकपूर्व जामीनासाठी दिल्लीतून न्यायालयावर दबाव आणण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोपही संजय राऊत यांनी केला आहे, पण न्यायालयात सत्याचा विजय होतो, आमची न्यायालये यांच्या दबावाला बळी पडणार नाहीत. फक्त हे दोन लफंंगे कुठे आहेत ते पोलिसांनी तात्काळ शोधावे, असेही संजय राऊत यांनी म्हटले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com