नवनीत राणांना केंद्राची सुरक्षा का मिळाली हे खासगीत सांगू : संजय राऊत

Navneet Rana | Ravi Rana | Sanjay Raut : परत जर शिवसेनेच्या अंगावर याल तर, गोवऱ्या रचून या; राऊतांचा इशारा
नवनीत राणांना केंद्राची सुरक्षा का मिळाली हे खासगीत सांगू : संजय राऊत
Sanjay Raut Sarkarnama

मुंबई : मागील दोन दिवसांपासून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या मातोश्री निवासस्थानाबाहेर जाऊन हनुमान चालिसा वाचण्यावरुन राज्यात सुरु असलेल्या शिवसेना विरुद्ध राणा दाम्पत्य संघर्षाला आता पूर्णविराम मिळालेला आहे. खासदार नवनीत राणा (Navneet Rana) आणि आमदार रवि राणा (Ravi Rana) यांनी आपल्या भूमिकेवरुन माघार घेणार असल्याची घोषणा केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या उद्या (रविवारी) मुंबई दौऱ्यावर येत आहेत. त्यांच्या दौऱ्याला गालबोट लागू नये त्यामुळे आपण हा निर्णय घेतला असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

यानंतर शिवसेनेने (Shivsena) मुंबईसह राज्यभरात फटाके फोडून विजयोत्सवाचा आनंद साजरा केला जात आहे. या संदर्भात बोलताना शिवसेना नेते संजय राऊत यांनी मातोश्रीवर घुसून हनुमान चालिसा वाचणं जणू आम्ही सत्यवादी महान योद्धे आहोत असा आव आणला मात्र, मोदींच्या दौऱ्याला गालबोट लागू नये यासाठी त्यांनी पळ काढला अशी खोचक टीका नवनीत राणा आणि रवी राणा यांच्यावर केली. तसेच पंतप्रधानांच्या रक्षणासाठी सेना उभी राहणार आहे, असेही राऊत म्हणाले.

Sanjay Raut
मोठी बातमी : शिवसैनिक आक्रमक झाल्याने राणा दांपत्य माघार घेण्याच्या तयारीत?

संजय राऊत यांनी यावेळी राणा दाम्पत्याच्या पाठीशी भाजप असल्याचाही आरोप केला. तसेच राणांच्या खांद्यावर बंदूक ठेवून शिवसेनेवर (Shivsena) हल्ला करण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप करत राऊत म्हणाले, पण परत शिवसेनेच्या अंगावर याल तर, येतांना स्मशानात गोवऱ्या रचून या, असा इशाराही त्यांनी दिला. तसेच गरज पडल्यानंतर शिवसेनेने हातात हातोडेदेखील घेतले आहेत. त्यामुळे कुणी आम्हाला हिंदुत्व शिकवण्याचा शहाणपणा करू नये, असेही ते म्हणाले. यावेळी राऊत यांनी नवनीत राणांना मिळालेल्या Y+ सुरक्षेवर देखील प्रश्नचिन्ह उपस्थित करत ही व्यवस्था नेमकी का मिळाली ते खाजगीत सांगू अशी टिप्पणी केली.

Sanjay Raut
राणा दाम्पत्य ना मुंबईत थांबणार ना अमरावतीला जाणार! आजचं दिल्लीला रवाना होणार

राऊत म्हणाले की, अमरावतीचे बंटी-बबली हनुमान चालिसा पठणं करण्यासाठी मुंबईत आले. पण हे बोगस घंटाधारी हिंदुत्ववादी असून त्यांनी मुंबईत येवून वातावरण गढूळ करत गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला. मात्र शिवसेनेचं हिंदुत्व घंटाधारीचं नसून आमचं हिंदुत्व गदाधारी असल्याचे राऊत म्हणाले. याशिवाय शिवसेनेला हिंदुत्व शिकवण्याचा अतिशहाणपणा कुणी करू नका, मातोश्रीच्या वाटेला जाऊ नका नाहीतर २० फुट खाली गाडले जाल असा इशाराही राऊत यांनी दिला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.