राऊतांनी सोमय्यांना पुन्हा डिवचले, 140 कोटी जमा करणार होते, पण 58 कोटीच जमवले

Sanjay Raut| Kirit somaiya| संजय राऊत यांनी आयएनएस विक्रांत प्रकरणी सोमय्या पिता पुत्रांवर आरोप केल्यापासून हा मुद्दा चांगलाच तापला आहे.
Sanjay Raut| Kirit somaiya
Sanjay Raut| Kirit somaiya

मुंबई : आयएनएस विक्रांत युद्धनौका निधी गैरव्यवहारामध्ये गुन्हा दाखल झालेले भाजपचे (BJP) नेते किरीट सोमय्या (Kirit somaiya) यांना न्यायालयाने सोमय्यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला आहे. सोमवारी (११ एप्रिल) त्यांनी दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी पार पडली. त्यानंतर आज शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay raut) यांनी ट्विट करत पुन्हा सोमय्या पिता पुत्रांवर निशाणा साधला आहे.

''किरीट सोमय्या 140 कोटी रुपये जमा करून राजभवनात देणार होते. त्यांना 58 कोटी जमवता आले. Ins vikrant 60 कोटी ना भंगारात गेली. 58 कोटीचा हिशेब लागत नाही..जे सोमय्या बाप बेट्याने जमा केले. हिशोब तर द्यावाच लागेल. 58 कोटी हडप केले नसते तर विक्रांत वाचवता आली असती.. जय महाराष्ट्र! '' अशी टिका संजय राऊत यांनी केली आहे.

Sanjay Raut| Kirit somaiya
सोमय्यांना न्यायालयाचा दणका! अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला

तर, न्यायालयाने सोमय्यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळताच संजय राऊत यांनी ट्विट केले आहे. त्यांना या ट्विटमध्ये माजी गृहमंत्री अनिल देशमुख आणि मंत्री नवाब मलिक यांचा संदर्भ दिला आहे. राऊतांनी थेट सोमय्यांचा मुक्काम कुठे असेल याचे भाकित वर्तवले आहे. त्यांनी म्हटले आहे की, बाप बेटे जेल जायेंगे.. अनिल देशमुख, नवाब मलिक के बाजूकेही कोठडी मे रहेंगे..आग लगाने वालो को कहाँ खबर, रुख हवाओं ने बदला तो खाक वो भी होंगे..

संजय राऊत यांनी आयएनएस विक्रांत प्रकरणी सोमय्या पिता पुत्रांवर आरोप केल्यापासून हा मुद्दा चांगलाच तापला आहे. यावरुन किरीट सोमय्या आणि शिवसेना खासदार संजय राऊत पुन्हा आमनेसामने आले आहेत. आयएनएस विक्रांत प्रकरणी पोलिसांनी समन्स बजावल्यापासून किरीट सोमय्या नॉट रिचेबल आहेत. संजय राऊतही यावरून सोमय्यांना डिवचण्याची एकही संधी सोडत नाहीत.

जर तुम्ही गुन्हा केला नाही म्हणता, घाबरत नाही म्हणता, इतरांना त्यांच्या भ्रष्टाचारावरून प्रश्न विचारता न्यायालयाला सामोरे जा, म्हणता तर तुम्ही का पळून जाता? असा थेट सवाल राऊतांनी केला होता. सोमय्या नॉट रिचेबल का आहेत, याबाबत राऊतांना विचारले असता, भाग सोमय्या भाग हा नवीन सिनेमा आता काश्मीर फाईलवाल्यांनी काढायला पाहिजे, अशा शब्दात त्यांनी सोमय्यांना चिमटा काढला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in