पुरावे कसले मागता?,' राऊतांनी निवडणूक आयोगालाच फटकारलं

Eknath shinde| Sanjay raut | शिंदे गटाने निवडणूक आयोगाला पत्र पाठवून शिवसेना पक्ष आणि त्याचे धनुष्यबाण चिन्ह हे शिंदे गटाला मिळावे, अशी मागणी करणारे पत्र दिले.
 Sanjay raut |
Sanjay raut |

मुंबई : ''शिवसेना आमची आहे, याचे पुरावे कसले मागता?,'' अशा शब्दांत शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी निवडणूक आयोगालाही अप्रत्यक्षपणे फटकारले आहे. शिंदे-शिवसेना वाद आता खरी शिवसेना कोणाची इथपर्यंत पोहचला आहे. याचा सोक्षमोक्ष लावण्यासाठी निवडणूक आयोगाने उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गटाला पुराव्यांची कागदपत्रं सादर करण्याचे आदेश दिल्याने राऊतांनी संताप व्यक्त केला आहे. मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या पत्रकारपरिषदेत ते बोलत होते.

एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी (१९ जुलै) केंद्रीय निवडणूक आयोगाला पत्र पाठवून शिवसेना पक्ष आणि त्याचे धनुष्यबाण चिन्ह हे शिंदे गटाला मिळावे, अशी मागणी करणारे पत्र दिले. त्यानंतर दुसरीकडे शिवसेनेकडूनही केंद्रीय निवडणूक आयोगाकडे यासंदर्भात कॅव्हेट दाखल करण्यात आले. यावर निवडणूक आयोगानेहा ८ ऑगस्टला दुपारी १ वाजेपर्यंत आपलं म्हणणं मांडण्याची मुदत दोन्ही गटांना दिली आहे. निवडणूक आयोगाने शिवसेनेतील दोन्ही गटांना कागदोपत्री पुरावे सादर करण्याचे आदेश दिले आहेत.

 Sanjay raut |
अयोद्धेच्या शंकराचार्य महाराजांनी घेतली अण्णा हजारेंची भेट

यावर राऊतांनी संताप व्यक्त केला आहे. 56 वर्षांपूर्वी दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांनी मराठी माणसासाठी हिंदुत्वाचा विचार घेऊन पुढे जाणारी संघटना स्थापन केली. त्या संघटनेला निवडणूक आयोग पुरावे कसले मागत आहे, असा सवाल राऊतांनी उपस्थित केला. राज्यातील ११ कोटी जनता हीच शिवसेना आमची असल्याचा पुरावा आहे. महाराष्ट्र सीमाप्रश्नाच्या आंदोलनातील हुतात्मे, राज्यातील शिवसैनिक हाच आमचा पुरावा असल्याचे राऊतांनी म्हटलं आहे. विधानसभा अध्यक्षांनी शिंदे गटाला २४ तासांत शिवसेना म्हणून मान्यता कशी दिली. लोकशाहीचा खून होत असताना कोणते पुरावे द्यायचे, असाही सवाल संजय राऊत यांनी केला आहे.

आज तुम्ही घोड्यावर बसले आहात, पण उद्या लोक तुमची गाढवावरून धिंड काढल्याशिवाय राहणार नाही. त्यांची राजकीय तिरडी उठणारच ! हे लक्षात ठेवा. फुटीरांनी खरी शिवसेना कोणाची, हे सिद्ध करून दाखवण्याची वेळ आणली हे दुर्दैव आहे. आपण फुटीर आहात, नव्या संसारात सुखी राहा. पण दिल्लीश्वरांना बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना संपवायची आहे. त्यासाठी ते फुटलेल्या आमदारांचा हत्यार म्हणून वापर करत आहेत. पण आम्ही बाळासाहेबांच्या शिवसेनेसोबत आहोत. आज आमच्यावर पुरावे सादर करण्याची वेळ आणली आहे. पण त्यांना या पापाची परतफेड करावी लागेल. आई जगदंबा माफ करणार नाही, असा इशाराही राऊत यांनी दिला. पैशाने आणि दहशतीने फोडलेली लोकं हा पुरावा होऊ शकत नाही, असेही संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in