Sanjay Raut : भाजपच्या भाडोत्री लोकांना शिवसेनेचा धनुष्यबाण पेलवणार आहे का? राऊतांनी पुन्हा डिवचलं

मिंधे गटाचे लोक जे काही बोलतात त्यांच्याकडे लक्ष द्यायची गरज नाही कारण त्याची स्क्रिप्ट भाजपवाले लिहून देतात
Sanjay Raut
Sanjay Raut Sarkarnama

Sanjay Raut Criticized BJP : शिवसेनेचा धनुष्यबाण घेऊन भारतीय जनता पक्षातले भाडोत्री लोक त्यांच्या यात्रेत फिरत होते, त्यांना धनुष्यबाण पेलवणार आहे का, हा प्रश्न काल उद्धवजींना त्यांच्या सभेत विचारला. अशा शब्दात खासदार संजय राऊत यांनी भाजपला डिवचलं आहे.

काल कोकणात उद्धवजींची विराट सभा झाली, या सभेनंतर अनेकांचे बोल बिघडले हे तुम्हीपण पाहिलं असेल. धनुष्यबाण हे चिन्ह आणि शिवसेना हे नाव तुम्ही चोरलं असलं तरी लाखो जनता आजही उद्धव ठाकरे यांच्यामागे ठामपणे उभी आहे. हे तुम्ही मान्य केलं पाहिजे. ही खोक्याने विकत घेतलेली जनता नव्हती. कालच्या सभेने महाराष्ट्राचा कौल स्पष्ट झालाय की शिवसेना ही फक्त उद्धव ठाकरेंचीच आहे. अशा शब्दात खासदार संजय राऊत यांनी विरोधकांना ठणकावले आहे.

Sanjay Raut
Nana Patole : नाना पटोलेंच्या घरी सराफा व्यावसायिकाचा गोंधळ, पीए डागेंवर केला आरोप!

आता तुम्ही आव्हान सभा, अमुक सभा याला काय अर्थ आहे. पण कोकण आणि शिवसेना हे अतुट नातं आहे हे काल स्पष्ट दिसलं. त्यानंतर आता मालेगावला सभा होईल. अशा सभांमधून महाराष्ट्रातील जनतेच्या मन जिंकण्याची मोहिम सुरु आहे. कालच्या सभेने अजून एक गोष्ट स्पष्ट झाली की, निवडणूक आयोगाच्या निर्णय़ावर जनता किती संतप्त आणि चिडलेली आहे. काल उद्धव ठाकरेंनी जी भूमिका मांडली की, शिवसेना ही काय कुणाच्या बापाची नाही की उचलावी आणि कुणालाही द्यावी. ती जनतेची आहे. असा हल्लाबोलही संजय राऊत यांनी केला आहे.

मिंधे गटाचे लोक जे काही बोलतात त्यांच्याकडे लक्ष द्यायची गरज नाही कारण त्याची स्क्रिप्ट भाजपवाले लिहून देतात त्यानुसार ते देतात, त्यांच्याकडे दुर्लक्ष करावं, असी जनतेची इच्छा आहे. आम्ही शिमगा करत नाही, जनता यांचा आपोआप शिमगा करणार आहे.

Sanjay Raut
Sambhaji Patil Nilangekar News : निलंगेकरांनी देशमुखांना पुन्हा डिवचलं ; म्हणाले, "गढी हलत नसली, त्यातली माणसे.."

ज्या प्रकारे तपास यंत्रणांच्या माध्यमातून विरोधी पक्षनेत्यांवर दबाव आणला जातोय ही काही लोकशाही नाहीये. ही हुकूमशाही किंबहुना त्याहून अधिक आहे. अशा प्रकारे तालीबान आणि अलकायदा सारखे लोक आपल्या विरोधकांना संपण्यासाठी हत्यारे उचलतात, तशा पद्धतीने हे सरकार ईडी, सीबीआय या हत्यारांचा वापर विरोधकांना संपवण्यासाठी हे सरकार वापरत आहे. असा आरोप संजय राऊतांनी केला आहे. त्यामुळेच नऊ राज्यातील विरोधी पक्षनेत्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्राद्वारे या हुकूमशाहीबद्दल कळवलं आहे. खरंतर त्यांना हे सर्व सांगायची गरज नाही, कारण त्यांच्याच आदेशाने हे सर्व होत आहे. असा आरोपही संजय राऊतांनी केला आहे. पण जनता आणि पंतप्रधानांच्या समोर हे सर्व मांडणे हे आमचे काम आहे आणि आम्ही ते करत राहु, असंही संजय राऊतांनी म्हटलं आहे.

कॉंग्रेस खासदार राहुल गांधी यांनी देशाची लोकशाही धोक्यात असल्याचं म्हटलं आहे. यावर बोलताना संजय राऊत म्हणाले की, भारताची लोकशाही धोक्यात नाही तर जवळपास संपलीच आहे. केंब्रिज विद्यापीठात राहुल गांधींनी हे वक्तव्य केलंय मी त्याच्यांशी सहमत आहे. या देशाची लोकशाहीने धोक्याची पातळीही ओलांडली आहे. या लोकशाहीचा मुडदा पडलाय अशी परिस्थिती निर्माण झालीये

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com