Sanjay Raut Statement: कुणाचा पोपट मेलाय..हे कळेल ! ; राऊतांनी फटकारलं.., पवारांच्या पुस्तकात फडणवीसांवर..

Sanjay Raut On Devendra Fadnavis: "घटनाबाह्य सरकारचा पोपट मेला आहे,"
Sanjay Raut and Devendra Fadnavis
Sanjay Raut and Devendra Fadnavissarkarnama

Sanjay Raut On Devendra Fadnavis : राज्यात सत्ताधारी आणि विरोधी पक्षांमध्ये नव्याने कलगीतुरा रंगताना दिसत आहे. गुरुवारी पुण्यात एका कार्यक्रमात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी तुफान टोलेबाजी केली.

"ठाकरे गटाची एकही मागणी सर्वोच्च न्यायालयाने मान्य केलेली नाही. तरीही उद्धव ठाकरे म्हणतात न्यायालयाचा निकाल सर्वांपर्यंत पोहोचवा. त्यामुळे बडवा काय बडवायंच ते, आमच्या बापाचं काय जातंय, असा टोला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांना लगावला.

Sanjay Raut and Devendra Fadnavis
Nitesh Rane : 'जसा पक्षप्रमुख तसे त्यांचे नेते' ; राणेंनी डिवचलं, उद्धव ठाकरेंही पदं विकतात..

सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर फडणवीस म्हणाले, "पोपट काही खात नाही, पीत नाही. बोलत नाही. मान हलवत नाही. पाय हलवत नाही. अशीच या निर्णयानंतर ठाकरेंची अवस्था झाली आहे”, असं फडणवीस म्हणाले. 'पोपट मेलाय,' असं त्यांना सांगायला पाहिजे, असे ते म्हणाले. यावर खासदार संजय राऊत यांनी पत्रकारांनी विचारले असता त्यांनी फडणवीसांवर सुनावलं. राऊत नांदेड येथे बोलत होते.

शरद पवार यांच्या “लोक माझा सांगाती” या पुस्तकातील उद्धव ठाकरे यांच्या संदर्भातील काही वाक्ये फडणवीस यांनी पुण्यातील भाजपच्या कार्यकारिणीच्या बैठकीत वाचून दाखवली. याबाबत संजय राऊत यांना पत्रकारांनी विचारले.

Sanjay Raut and Devendra Fadnavis
BJP Mission 2024 : कर्नाटकातील पराभवानंतर भाजपची आजपासून नवी योजना ; प्रत्येक लोकसभा मतदारसंघात..

हे जनता दाखवेल..

"शरद पवार यांच्या 'लोक माझे सांगती' पुस्तकात फडणवीसांवर सुद्धा काही वाक्य आहेत. ती त्यांनी वाचून दाखवायला पाहिजे होती. ते म्हणाले की पोपट मेलाय. आता कुणाचा पोपट उडतोय आणि कोणत्या वाघाची गर्जना होतेय हे त्यांना कळेल. कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकांत जे चित्र दिसलं ती फक्त झलक आहे.१४ महापालिकांच्या निवडणुका ताबडतोब घ्या, मग कळेल कुणाचा पोपट मेलाय. हे जनता दाखवेल," अशा शब्दात राऊतांनी फडणवीसांच्या विधानाचा समाचार घेतला. "घटनाबाह्य सरकारचा पोपट मेला आहे," असेही ते म्हणाले.

आमची खिल्ली उडवतात. पाहू ना..

खिल्ली कशावर उडवायला हवी? काल त्यांच्या कार्यकारिणीच्या बैठकीत अर्धे लोक झोपलेले होते. झोपलेल्या लोकांसमोर बोललेत ना ते. त्यांचे मोठमोठे नेते झोपले होते, काही जांभया देत होते. अशा मेलेल्या कार्यकर्त्यांसमोर हे आमची खिल्ली उडवतात. पाहू ना”, असे राऊत म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com