Narayan Rane-Sanjay Raut
Narayan Rane-Sanjay Raut

Narayan Rane-Sanjay Raut Controversy: संजय राऊत खासदार झाले, हे तर माझेच पाप; असं का म्हणाले, नारायण राणे

नारायण राणेंनी मला बोलायला लावू नये, मी त्यांची आर्थिक प्रकरणे बाहेर काढली तर ते ५० वर्षे तुरुंगात जातील, असं वक्तव्य संजय राऊतांनी केले होते

Narayan Rane- Sanjay Raut Controversy : केंद्रीय मंत्री नारायण राणे शिवसेनेवर टिका करण्याची एकही संधी सोडत नाहीत. राज्यातील सत्तांतरानंतर तर हा ठाकरे - राणे यांच्यातील चकमकी अधिकच वाढल्या आहेत. काही दिवसांपुर्वी नारायण राणेंनी खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांना पुन्हा तुरुंगात टाकण्याचा इशारा दिला होता. तर हिंमत असेलतर मला तुरुंगात टाकून दाखवाच, नारायण राणेंनी मला बोलायला लावू नये, मी त्यांची आर्थिक प्रकरणे बाहेर काढली तर ते ५० वर्षे तुरुंगात जातील, असा पलटवार राऊतांनी केला होता.

हा वाद शमला नसताना आता पुन्हा राणेंनी खासदार राऊतांवर निशाणा साधला आहे. राऊत यांची खासदारकी माझंच पाप असल्याचं वक्तव्य राणेंनी केलं आहे. यामुळे पुन्हा एकदा राणे-शिवसेना संघर्ष पेटण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. एका कार्यक्रमात बोलताना राणेंनी संजय राऊतांच्या खासदारकीवर भाष्य केलं आहे.

Narayan Rane-Sanjay Raut
BrijBhushan Singh News : भाजप खासदाराने मानले राज ठाकरेंचे आभार ; म्हणाले, '..तो विषय आता..'

संजय राऊत हा खासदार आहे. ते माझंच पाप आहे. मी विधीमंडळात विरोधीपक्षनेता होतो. एकदा मला बाळासाहेब ठाकरे यांनी बोलावल. मी गेलो तेव्हा संजय राऊतही तिथे होते. आपल्याला संजय राऊतांना खासदार बनवायचं आहे. असं मला बाळासाहेबांनी सांगितलं. उद्या त्यांचा फॉर्म भरा आणि त्यांला खासदार करा, असं सांगितलं. मी बाळासाहेबांना आयुष्यात कधीही नाही म्हणालो नाही. मी त्यांना होकार दिला आणि दुसऱ्या दिवशी संजय राऊत यांना माझ्या दालनात कागदपत्रे घेऊन बोलावलं,” असा दावा नारायण राणे यांनी केला.

याचवेळी त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावरही निशाणा साधला. उद्धव ठाकरेंनी विचारल्यावर मी सांगेन त्यांना आम्ही काय काय पोहचवलं आणि कोणत्या कोणत्या माळ्यावर पोहचवलं. बोलायला लावू नका, वयाच्या १५ व्या वर्षापासून मी शिवसेनेत होतो. बाळासाहेबांनी प्रेम दिलं, आणि विश्वासही दिला म्हणून आम्ही त्यागाला तयार होतो. जिवाची पर्वा न करता आम्ही त्याग केला.

शिवसेनेसाठी आम्ही त्याग केला. माझ्यासारख्या असंख्य शिवसैनिकांचा हा त्याग आहे. पण उद्धव ठाकरे हे आयत्या बिळात नागोबासारखे अडीच वर्ष मुख्यमंत्री पदावर बसले. काय केलं त्यांनी. त्यांना खोके म्हणता मग आम्ही काय पुष्पगुच्छ घेऊन येत होतो का मातोश्रीला असंही राणेंनी म्हटलं आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com