
Budget Session News : आजपासून राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन (Maharashtra Budget Session 2023) सुरू होत आहे. विरोधी पक्ष सरकारला विविध मुद्द्यांवर घेरण्याच्या तयारीत आहेत. दरम्यान विधिमंडळा सभागृहा बाहेरच सरकार आणि विरोधक यांच्यावर आरोप प्रत्यारोप, टिका टिपण्णी सुरू झाली आहे. शिवसेना ठाकरे गटाचे नेते व खासदार संजय राऊत यांनी केंद्र तसेच राज्य सरकारवर हल्लाबोल केला आहे.
संजय राऊत म्हणाले, " राज्यात भयंकर होताना दिसतंय. राजकीय विरोधांना विविध प्रकरणामध्ये गुंतवून, सरकारविरोधात आवाज उठवतात, त्यांना अटक केली जात आहे. त्यांना जामीन मिळू द्यायचा नाही. केंद्रीय यंत्रणांचा वापर करायचा. हे बेफामपणे सुरू आहे. मनीष सिसोदिया हे दिल्लीचे उपमुख्यमंत्री आहेत. अबकारी धोरणासंदर्भात त्यांना अटक केली. अशा प्रकरचे निर्णय हे कॅबिनेटचे असतात. व्यक्तीचे नसतात, हे लक्षात घेतले पाहिजे."
राऊत पुढे म्हणाले, "या देशातली लोकशाही रोज खडड्यात जाताना दिसत आहे. नुकतेच केजरीवाल हे उद्धव ठाकरे यांना भेटले. या सगळ्या प्रकारणाला सामोरे जाऊन लढत राहून.केंद्र सरकारमध्ये काय सगळे संत आणि महात्मे भरलेले आहेत का? एलआयसीचे पैसे बुडवण्यात आले. प्रचंड नुकसान झालंय. पंजाब नॅशनल बँक, स्टेट बँक कुणी बुडवली? त्यांनी साधी नोटीस पाठवायची हिंमत झाली का? य़ा महाराष्ट्रात आय़एनएस विक्रांत वाचवण्याच्या नावाने सर्वात मोठा घोटाळा झाला."
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.