'संभाजीराजेंसाठी शिवसेनेने यापेक्षा अधिक काय करायला हवे होते?'

संजय राऊत (Sanjay Raut) आणि संजय पवार (Sanjay Pawar) राज्यसभेच्या निवडणुकीसाठी उद्या उमेदवारी अर्ज भरणार आहेत
'संभाजीराजेंसाठी शिवसेनेने यापेक्षा अधिक काय करायला हवे होते?'
Sambhaji Raje Chhatrapati sarkarnama

मुंबई : शाहू घराण्याचा सन्मान राखण्याच्या हेतूनेच संभाजीराजे छत्रपती (Sambhaji Raje Chhatrapati) यांना शिवसेनेच्या (Shivsena) कोट्यातली जागा देण्याची तयारी शिवसेनेने केली होती. त्यापेक्षा शिवसेना काय करु शकते, असा सवाल करत शिवसेना नेते खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी आज सहाव्या जागेबाबतच्या उमेदवारीचे विषय आमच्यासाठी संपल्याचे स्पष्ट केले. दरम्यान, गुरुवारी विधानभवनात दुपारी १ वाजता मुख्यमंत्री उध्दव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aghadi) नेत्यांसह संजय राऊत आणि संजय पवार राज्यसभेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरणार आहेत. (Rajya Sabha Latest Marathi News)

राज्यसभेच्या रिंगणात अपक्ष म्हणून उतरलेले संभाजीराजे यांना पाठिंबा देण्याऐवजी शिवसेनेने संजय पवार यांना उमेदवारी जाहीर केली. त्यामुळे संभाजीराजे यांचे समर्थक व काही मराठा संघटनांमध्ये नाराजी आहे. शिवसेनेला हे महाग पडेल शिवसेनेने गद्दारी केली असल्याचे इशारे दिले जात आहेत. हे इशारे देणाऱ्यांना राऊत यांनी खडे बोल सुनावले आहेत.

 Sambhaji Raje Chhatrapati
खोतांचा पत्ता कट होणार; मेटेंनाही धाकधूक : पंकजा, बोंडे विधान परिषदेवर शक्य

राऊत म्हणाले, शिवसेनेने सहाव्या जागेसाठी उमेदवारी जाहीर करण्याचा आणि संभाजीराजेंच्या अपमानाचा काहीही संबंध नाही. हा विषय आमच्या दृष्टीने संपलेला आहे. संभाजीराजे यांना शिवसेनेच्या कोट्यातून जागा द्यायला, आम्ही तयार झालो होतो. त्यांचा आणि घराण्याचा सन्मान राखण्याचाच हेतू यामागे होता. राज्यसभेवर निवडून जाण्यासाठी ४२ मतांचा कोटा लागतो, त्यासाठी संभाजीराजेंना मदत करण्याची आमची तयारी होती. यापेक्षा शिवसेना काय करु शकते, असा प्रतिप्रश्न राऊत यांनी केला.

राज्यसभेवर निवडून जाण्यासाठी संभाजीराजेंनी शिवसेनेत प्रवेश करावा व पक्षाचे उमेदवार म्हणून निवडून यावे, अशी आमची भूमिका होती. ती काही अट नव्हती. राजघराण्यातील व्यक्तीला राजकीय पक्षांचे वावडे असण्याचे कारण नाही. याआधी शाहू महाराज सीनियर यांनी शिवसेनेत प्रवेश केला होता. मालोजीराजे भोसले राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार होते. स्वत: संभाजीराजे यांनी राष्ट्रवादीकडून लोकसभा लढली होती. त्यात त्यांचा पराभव झाला होता.

 Sambhaji Raje Chhatrapati
राज्यसभेची सहावी जागा चुरशीची : भाजप काँग्रेस-राष्ट्रवादीतील आयात नेत्यांचे पत्ते पिसणार

त्यामुळे छत्रपतींच्या घराण्यातील कोणी राजकीय पक्षात जात नाही हा त्यांच्या समर्थकांचा दावा चुकीचा आहे. देशातील अनेक घराणी कुठल्या ना कुठल्या पक्षात काम करून त्यांचे सामाजिक कार्य पुढे नेत असतात. शिवसेनेने संभाजीराजेंना सहकार्य करण्याचा निर्णय घेतला होता. त्यांच्याशी चर्चाही झाली होती. त्यांच्या समर्थकांनी १५ दिवसांतील घडामोडी समजून घेतल्या पाहिजेत,' असेही राऊत म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in