Sanjay Raut : राहुल कुल यांच्यानंतर आता दादा भुसे राऊतांच्या निशाण्यावर ; म्हणाले 'लवकरच स्फोट...'

Sanjay Raut : दादा भुसेंवर शेअर्स लाटल्याचा राऊतांचा आरोप..
Sanjay Raut : Dada Bhuse
Sanjay Raut : Dada BhuseSarkarnama

Shivsena News : शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत हे मागील काही दिवसांपासून अॅक्शन मोडवर दिसत आहेत. शिंदे - फडणवीस सरकारला घेरण्याचा प्रयत्न करत आहेत. संजय राऊत (Sanjay Raut) यांनी आमदार राहुल कुल यांच्या विरोधात भ्रष्टाचाराचा आरोप केले होते. यानंतर आता राऊत यांचे पुढचे लक्ष्य राज्याचे कॅबिनेट मंत्री दादा भुसे (Dada Bhuse) आहेत. राऊतांनी भुसेंवर भ्रष्टाचाराचे आरोप केले आहेत.

संजय राऊतांनी सोमवारी (20 मार्च ) रात्री एक ट्वीटमध्ये दादा भुसे यांचे थेट नाव घेऊन गिरणा अॅग्रो नावाने त्यांनी कोट्यवधी रूपयांचे शेअर्स जमावल्याचा गंभीर आरोप राऊतांनी केला आहे. एवढे शेअर्स घेऊनही वेबसाईटवर मात्र अत्यंत कमी रकमेचे शेअर्स दाखवल्याचा आरोपही राऊतांनी केला आहे. त्यामुळे राऊत आता सरकारमधील मंत्र्यांवर भ्रष्टाचाराच्या आरोपांची मालिका सुरू करत आहेत का? असा सवाल उपस्थित केला जात आहे.

Sanjay Raut : Dada Bhuse
Mamata Banerjee : राहुल गांधी हेच मोदींचे सर्वात मोठे 'टीआरपी' ; ममता म्हणाल्या, "राहुल गांधींना 'हिरो'बनविण्याचा प्रयत्न.."

राऊतांनी ट्विटमध्ये काय म्हंटलंय?

गिरणा अॅग्रोच्या नावाने लूट माजवल्याचा दावा राऊतांना केला आहे. दादा भुसेंचा फोटो त्यांनी ट्वीटमध्ये शेअर करत राऊत म्हणाले, "हे आहेत मंत्री दादा भुसे. शेतकरी त्यांच्याविरोधात रस्त्यावर आले आहेत. गिरणा अॅग्रो नावाने १७८ कोटी २५ लाखांचे शेअर्स शेतकऱ्यांकडून गोळा केले गेले. पण कंपनीच्या वेबसाईटवर मात्र फक्त १ कोटी ६७ लाखांचे शेअर्स आहेत. तेही फक्त ४८ सभासदांच्या नावावर दाखवण्यात आले आहेत. ही लूट आहे. लवकरच स्फोट होईल”.

Sanjay Raut : Dada Bhuse
Palghar News: सरकारी कार्यालयांचा दलालांचा विळखा सोडवू!

बार्शीत नेमकं काय घडलं?

दादा भुसेंवर आरोप केल्यानंतर संजय राऊत यांनी सोलापूरमधील बार्शी तालुक्यातील्या प्रकाराबाबतही ट्वीट केले आहे. यामध्ये त्यांनी शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारेंच्या सभेतला एका व्हिडीओचाही उल्लेख केला आहे. “बार्शीत नक्की काय घडलं. सुषमाताई अंधारे यांनी नेमक्या शब्दांत चिरफाड केली. एका मुलीवर अत्याचार झाला. आवाज उठवला म्हणून थेट माझ्यावर गुन्हा दाखल झाला. सरकार बेकायदेशीर. कारवाई बेकायदेशीर. पीडितेच्या आईने इच्छा मरणाची मागणी केली का? काय चालू आहे महाराष्ट्रात?” असा सवाल संजय राऊतांनी उपस्थित केला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com