ईडी कार्यालयात जाताना दिसला संजय पांडेचा साधेपणा; थाट बाजूला ठेऊन रिक्षाने प्रवास

Sanjay Pandey| संजय पांडे हे गेल्याच आठवड्यात मुंबईचे पोलीस आयुक्त म्हणून निवृत्त झाले होते.
Sanjay Pandey|
Sanjay Pandey|

मुंबई : अंमलबजावणी संचालनालयाने (ED) मुंबईचे माजी पोलिस आयुक्त संजय पांडे यांची नॅशनल स्टॉक एक्सचेंज (NSE) को-लोकेशन घोटाळाप्रकरणी मंगळवारी (५ जुलै) ने चौकशी केली. विशेष म्हणजे, माध्यामांच्या नजरा चूकवून संजय पाडे ऑटो रिक्षाने सकाळी साडेअकराच्या दरम्यान ईडीच्या कार्यालयात पोहचले. संजय पांडे हे गेल्याच आठवड्यात मुंबईचे पोलीस आयुक्त म्हणून निवृत्त झाले होते. (Sanjay Pandey news in Marathi)

साधारण अडीच तास संजय पांडे यांची चौकशी केल्यानंतर दुपारी दोनच्या सुमारास त्यांना जेवणाची सुट्टी देण्यात आली. सुमारे आठ तासांच्या चौकशीनंतर सायंकाळी सातच्या दरम्यान ते ईडी कार्यालयातून बाहेर पडले. निवृत्त मुंबई पोलीस प्रमुखांनी 2001 मध्ये एका ऑडिट कंपनीची फसवणूक केल्याची बाब निदर्शनास आली होती. ती फसवणूक कशी केली याचा तपास करण्यासाठी तपास संस्थेने मनी लाँडरिंग कायद्याच्या (पीएमएलए) कायद्यांतर्गत पांडे यांचे जबाब नोंदवण्यात आले.

Sanjay Pandey|
आर्यन खान ड्रग्जचा तपास करणारे संजय सिंह कोण आहेत? सविस्तर वाचा

- काय आहे नॅशनल स्टॉक एक्सचेंज (NSE) को-लोकेशन घोटाळा?

संजय पांडे यांनी 2001 मध्ये पोलीस खात्यातील सेवेचा राजीनामा दिला आणि आयसेक सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड ही माहिती तंत्रज्ञान (आयटी) कंपनी सुरू केली. मात्र त्यावेळी तांत्रिक कारणामुळे त्यांचा राजीनामा स्वीकारण्यात आला नाही. त्यांना पुन्हा सेवेत हजर राहण्याच्या सूचना देण्यात आल्या.

2006 मध्ये संजय पांडेंनी त्यांच्या आई व मुलाला आपल्या कंपनीत संचालकपद दिले. संजय पांडे यांच्या या कंपनीकडे एनएसईचे सव्‍‌र्हर आणि संगणकीय यंत्रणा, माहिती तंत्रज्ञान लेखापरीक्षणाचे कंत्राट देण्यात आले होते. 2010 ते 2015 या कालावधीत लेखापरीक्षणाची जबाबदारी सोपविण्यात आलेल्या आयसेक सर्व्हिसेसच्या लेखापरीक्षण अहवालात एनएसईमधील गैरव्यवहार का उघड झाला नाही, याबाबत ही चौकशी करण्यात येत असल्याची माहिती आहे. एनएसई गैरव्यवहार प्रकरणात २०१८ मध्ये नोंदवलेल्या गुन्ह्यांच्या आधारे ईडी तपास करत आहे. संजय पांडे यांनी पांडे यांनी समाविष्ट केलेली फर्म 2010 ते 2015 या कालावधीत एनएसईमध्ये सिक्युरिटी ऑडिट करण्याचे काम सोपवलेल्या आयटी कंपन्यांपैकी एक होती, यालाच को-लोकेशन घोटाळा झाल्याचे मानले जाते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com