राज ठाकरेंना राज्य सरकार घाबरते; काँग्रेस नेत्याचा महाविकास आघाडीला घरचा आहेर

संजय निरुपम (Sanjay Nirupam) यांनी केलेल्या या वक्तव्यावर काँग्रेसने (congress) हात झटकले आहेत.
राज ठाकरेंना राज्य सरकार घाबरते; काँग्रेस नेत्याचा महाविकास आघाडीला घरचा आहेर
Raj Thackeray, Uddhav Thackeraysarkarnama

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (Mns) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांना राज्य सरकार घाबरते, त्यामुळेच 1 मेला औरंगाबादमध्ये सभेच्या अटींचे उल्लंघन केल्याप्रकरणी त्यांच्यावर कोणतीही कारवाई केली जात नाही, असा महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) सरकारला घरचा आहेर काँग्रेस (Congress) नेते संजय निरुपम (Sanjay Nirupam) यांनी दिला. राज्य सरकार राणा दांपत्यावर कारवाई करते. मात्र, राज ठाकरे यांच्यावर कारवाई करायला का घाबरते, असा सवालही त्यांनी केला.

निरुपम म्हणाले, औरंगाबादेत 12 अटींचे राज ठाकरेंनी उल्लंघन केले. तरीही त्यांच्यावर कठोर कारवाई झाली नाही. राणा दांपत्यांवर कारवाई झाली ते योग्य झाले. मात्र, ठाकरेंवर कारवाई का केली नाही? माझ्या मनात हा प्रश्न आहे, की राज ठाकरे यांना महाविकास आघाडी सरकार का घाबरतेय का? राज ठाकरे यांच्याकडून भावना भडकवण्याचे काम सुरु आहे. त्यांनी हे काम केलेय, त्यामुळे कारवाई व्हायला हवी. ती होत नाही, सरकारने ही प्रक्रिया जलद गतीने करावी आणि ठोस कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली.

Raj Thackeray, Uddhav Thackeray
कृष्णप्रकाश यांची बदली होताच आमदार अण्णा बनसोडे यांनाही कंठ फुटला!

राज ठाकरे रंग बदलतात, झेंडा बदलतात, यामागे भाजपचाच हात आहे. ते अयोध्याला जात आहेत, त्यामागे भाजपच आहे. भाजपने त्यांचा अजेंडा राज ठाकरे यांच्या मार्फत राबवण्यास सुरु केली आहे. भाजप आणि मनसे यांची हातमिळवणी झाली आहे. हिंदुत्वाचा अजेंडा चालवण्याआधी, उत्तर प्रदेश सरकारचे कौतुक करण्याआधी ठाकरेंनी मुंबईतील उत्तर भारतीयांची माफी मागितली पाहीजे, अशी मागणी निरुपण यांनी केली. राज ठाकरे यांनी उत्तर भारतीयांना मारले, त्यांच्या मनाला ठेच पोहोचवली. त्यांनी त्याबद्दल लोकांची माफी मागितली पाहिजे, असेही निरुपम म्हणाले.

Raj Thackeray, Uddhav Thackeray
दामाजी कारखान्याचं राजकारण तापलं; निवडणूक अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी

अयोध्याला कुणीही जाऊ शकतो, राज यांनीही जावे मात्र त्यांना याचा फायदा होईल असे वाटत नाही, असेही निरुपम म्हणाले. दरम्यान, निरुपम यांनी केलेल्या या वक्तव्यावर काँग्रेसने हात झटकले आहे. निरुपम यांचे हे वक्तव्य वैयक्तिक असून पक्षाचा त्याच्याशी काही संबंध नाही, असे काँग्रेसकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.