संजय कुटेंचा युटर्न; 'त्या' विधानावर मोठा खुलासा

BJP|Sanjay Kute| Politics| दोन दिवसांपूर्वी न्यायालयाच्या कारभारावर केलेल्या विधानावर विरोधकांनी घेरल्यानंतर संजय कुटेंनी खुलासा केला आहे.
Sanjay Kute|
Sanjay Kute|

मुंबई : भाजप आमदार संजय कुटे (Sanjay Kute) यांनी दोन दिवसांपूर्वी न्यायालयाच्या कारभारावर केलेलं विधान त्यांच्याच अंगलट आल्याचे दिसत आहे. संजय कुटेंच्या विधानाचा संदर्भ घेत शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay raut) यांनी थेट न्यायालयाच्या कारभारावरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले. त्यामुळे संजय कुटेंनी केलेल्या त्या विधानामागील भूमिका स्पष्ट केली आहे.

काय म्हणाले संजय कुटे ?

"न्यायालयाबद्दल काल मी जे विधान केलं त्याचा काही माध्यमांनी आणि नेत्यांनी विपर्यास केला. महाराष्ट्रात पोलीस प्रशासन आणि सरकारकडून भाजपच्या कार्यकर्त्यांवर आणि संबंधित संघटनांवर खोटे गुन्हे दाखल करण्याचे षडयंत्र सुरू आहे. असं कुटे यांनी सांगितलं.

Sanjay Kute|
हो, कोर्ट आमच्यासाठी आहे! राऊत आणि वळसे पाटलांच्या शंकेवर भाजप आमदाराचे उत्तर

"या प्रकारावर बोलताना मी म्हटलं होतं की यांनी कितीही खोटे गुन्हे दाखल केले, तरी न्यायालयात आम्हाला दिलासा मिळतच असतो. कारण आम्ही खरे आहोत. खऱ्या न्यायालयात खऱ्या लोकांना न्याय मिळतो. खोट्यांना लोकांना न्यायालयात दिलासा मिळत नाही, असा माझ्या बोलण्याचा अर्थ होता.

"न्यायालयात जाऊन आम्ही बऱ्याचशा गोष्टी करू शकतो. म्हणजे ज्यांनी आमच्यावर खोटे गुन्हे दाखल केले आहेत. ते रद्द कसे करता येतील त्यासाठी आम्ही न्यायालयात जाणार आहोत. आमच्यावर खोटे गुन्हे दाखल करणाऱ्यांवर आम्ही फौजदारी गुन्हे दाखल करणार आहोत. जे खरे असतील त्याला न्यायालयात न्याय मिळतो. आम्ही खोटे असू तर आमच्याविरोधातही न्याय होईल. इतकं स्पष्ट माझं मत होतं. पण त्याचा विपर्यास केला गेला."

Sanjay Kute|
सोनिया गांधींच्या घरी खलबतं; प्रशांत किशोरांच्या उपस्थितीत हायप्रोफाईल बैठक

जेव्हा तुम्ही आमच्यावर अन्याय कराल, तेव्हा आम्हीही त्याविरोधात तक्रार करतो. जनहित याचिका दाखल करतो. खरी बाजू जनतेसमोर आणतो आणि न्यायालय आम्हाला न्याय देते ही त्यामागची भूमिका आहे," असं कुटे यांनी यावेळी स्पष्ट केले.

याच वेळी त्यांनी संजय राऊत यांच्यावरही टिका केली. "संजय राऊत मला ओळखत नाहीत. ते विश्व प्रवक्ते आहेत. शिवसेनेचे नाही तर राष्ट्रवादीचे विश्व प्रवक्ते आहेत. आंतरराष्ट्रीय पातळीवर त्यांची ओळख आहे.पण एवढ्या मोठ्या माणसाने न्यायालयाच्या कारभारावर ताशेरे ओढणे किंवा न्यायालयावर टीका करणे,हे दुर्दैवी आहे. मला याची लाज वाटते," अशा शब्दांत कुटे यांनी राऊतांवर टिका केली.

कुटेंनी काय म्हणाले होते?

शेगावमध्ये एका मुद्द्यावर कुटे यांनी पोलीस प्रशासनाच्या विरोधात गुरुवारी पत्रकार परिषद घेतली होती. संजय कुटे म्हणाले की, "आम्हाला माहीत आहे, शासन, प्रशासन, पोलीस यंत्रणा आमच्या विरोधात कितीही वापरल्या तरीही कोर्ट आमच्यासाठी आहे. कोर्टातून आम्हाला न्याय मिळतो. कोर्टातून आम्हाला बऱ्याच गोष्टी करता येतात. आम्हाला काय करायचं ते आम्ही भविष्यात करणार आहोत," असे म्हणतं कुटे यांनी पत्रकार परिषदेत पोलिसांना व प्रशासनाला ठणकावलं.अशी भूमिका कुटे यांनी मांडली होती.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in