BJP-Shinde group Politics: बावनकुळेंचे जागावाटपाचे वक्तव्य: संजय गायकवाड म्हणाले, १२५ पेक्षा कमी नाहीच...

2024 विधानसभा निवडणुकीत भाजप 240 जागा लढवण्याच्या तयारीत असल्याचं चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलं.
BJP-Shinde group Politics
BJP-Shinde group Politics Sarkarnama

Sanjay Gaikwad replied Chandrashekhar Bavankule भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी जागा वाटपाच्या विधानावरुन सध्या राजकारण तापण्याची चिन्हे दिसू लागली आहे. 2024 विधानसभा निवडणुकीत भाजप 240 जागा लढवण्याच्या तयारीत असल्याचं चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे 50 हून अधिक जागा लढवण्यासाठी चांगले उमेदवार नाहीत.

शिवाय भाजपला शिंदे गटासह इतर मित्रपक्ष आणि अपक्षांसाठीही काही जागा सोडाव्या लागतील. तर शिंदे गटाकडे या 40 आमदार आणि काही अपक्ष आमदार आहेत.त्यामुळे विद्यमान आमदारांच्या जागा सोडल्या तर भाजप शिंदे गटासाठी जास्त जागा सोडणार नाही. असं बावनकुळे यांनी म्हटलं होतं. पण त्यांच्या या वक्तव्यामुळे वाद निर्माण होऊ शकतो, हे जाणवल्यावर त्यांनी सारवासारवही केली. आता बावनकुळे यांना शिंदे गटाचे नेते संजय गायकवाड यांनी उत्तर दिलं आहे. काहीही झालं तरी शिवसेना म्हणून आम्ही कमीत कमी १३० ते १४० जागा लढवणार असल्याचं गायकवाड यांनी म्हटलं आहे.

BJP-Shinde group Politics
Sanjay Kadam : मुख्यमंत्री म्हणून शिंदेंची ही शेवटची सभा असेल..

माध्यामांनी त्यांना याबाबत प्रश्न विचारल्यावर संजय गायकवाड म्हणाले की, पहिली गोष्ट म्हणजे हा शिंदे गट नाही तर शिवसेना आहे. दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांनी उभी केलेली शिवसेना आहे. ही शिवसेना भाजपची युती आहे. त्यामुळे कोण कुठला नेता घोषणा करत असेल तर त्याच्या शब्दाला काही महत्त्व नाहीये. असही संजय गायकवाड यांनी म्हटलं आहे.

आमची युती पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत आहे. त्यामुळे काहीही झालं तरी शिवसेना म्हणून आम्ही कमीत कमी १३० ते १४० जागा लढवणार आहोत. तसेच, भाजप आमच्या पेक्षा मोठा पक्ष आहे तर ते आमच्यापेक्षा जास्त जागा लढवतील पण शिवसेना म्हणून आम्ही १२५ ते १३० पेक्षा कमी जागा लढणार नाहीच. त्यामुळे अश वक्तव्ये कोणी करत असतील तर त्यांच्या पक्षश्रेष्ठींनी त्यांना समज द्यावी,अशा शब्दांत गायकवाड यांनी बावनकुळेंना टोला लगावला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com