Sandiapan Bhumare News : "भुमरेंनी केला 'टॅब घोटाळा.." ; विरोधी पक्षनेते दानवेंचा आरोप !

Sandipan Bhumare tab scam : सचिव निवृत्त होणार म्हणून घाईने निविदा काढली?
Sandiapan Bhumare News : Ambada Danve
Sandiapan Bhumare News : Ambada DanveSarkarnama

Sandipan Bhumare tab scam : नुकतंच शिंदे-फडणवीस सरकारमधील मंत्री अतुल सावे (Atul save) यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करण्यात आले होते. विकास कामांमधून 10 टक्के कमिशन घेतात असा ठपका विरोधी नेत्यांनी त्यांच्यावर ठेवला होता. यानंतर आता सरकरामधील रोहयो मंत्री संदीपान भुमरे यांच्या खात्यात मनरेगा अंतर्गत 26 हजार टॅब खरेदी काढलेल्या निविदेत घोटाळा झाल्याचा आरोप विधान परिषेदेतील विरोधीपक्ष नेने अंबादास दानवे (Ambadas Danve Allegation) यांनी केला आहे.

Sandiapan Bhumare News : Ambada Danve
Thackeray Vs Shinde : ठाकरे गटाला मोठा झटका; घाटकोपरमधील 'या' नेत्याचा कार्यकर्त्यांसह शिंदे गटात प्रवेश

यामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला असून, ही निविदा प्रक्रिया रद्द करून या प्रकरणाची विशेष स्तरावर सखोल चौकशी करावी, तसेच यामध्ये दोषी आढळणाऱ्या संबंधित कंपनीला बाद करून, त्यांना काळ्या यादीत टाकावी, अशी मागणी अंबादास दानवे यांनी केली. अशा आशयाचं पत्र दानवे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पाठवले आहे.

या घोटाळ्याप्रकरणी अंबादास दानवे म्हणाले, "या विभागाचे विद्यमान सचिव नंद कुमार (Nand Kumar) हे तीन दिवसांनी निवृत्त होणार आहेत. यामुळे या संबंधित निविदा काढण्याचा धडाका लावण्यात आला. मंत्री संदीपान भुमरे यांच्या खात्यात या निविदा काढण्यात आल्या. जवळपास 26 हजार 250 टॅब खरेदीची 70 कोटींची निविदा काढली गेलेली आहे.

या सर्व टॅबमध्ये जीआयएस मोबाईल अॅप समाविष्ट असावा, ही अट घालण्यात आली. खरंतर हे मोबाईल अॅप मोफत उपलब्ध करून देण्यात आले आहे, असे अशतानाही या अॅपसाठी 35 कोटी रूपयांचा खर्च दाखवण्यात आला आहे," असे अंबादास दानवे म्हणाले. (Tab Scam News)

Sandiapan Bhumare News : Ambada Danve
Narendra Modi : चीनची दादागिरी अन् पाकिस्तानची गुंडगिरी खपवून घेणार नाही; अमेरिकेचा इशारा

1 डिसेंबर 2016 च्या शासनाने घेतलेल्या निर्णयानुसार पाच कोटीपेक्षा अधिक रकमेच्या निविदा काढण्यासाठी उच्चाधिकार समितीची परवानगी देणे घेणे आवश्यकता असते. मात्र या टॅबखरेदीसाठी परवानगी घेण्यात आली नाही. सचिवांनी फक्त 1 ते 5 कोटी रूपयांचे निविदा काढण्याचा अधिकार आहे. मात्र यामध्ये त्यांनी 70 कोटींची निविदा काढण्यात आली. सबंधित सचिव लवकच निवृत्त होणार असल्याने निविदा घाईघाईत काढण्यात आली.

तसेच ही निविदा सॅमसंग कंपनी (Samsung Tab Scam) या एकालाच प्राधान्य देण्यात आले. या साठी मंत्र्यांनी आग्रह धरला, असा आरोप देखील त्यांनी केला आहे. भुमरेंच्या खात्यात एकूणच अनागोंदी कारभार सुरू आहे. तसेच, याबाबत चौकशी व्हावी, अशी मागणी दानवेंनी केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com