
Sandeep Deshpande Attack : “कोरोना काळातील भ्रष्टाचारात विरप्पण गॅंग कोणती, हे सर्वांना माहितीये. कोविडच्या आधीपर्यंत महावीर फर्निचर आणि ग्रेस फर्निचर या दोन फर्मचा टर्नओव्हर १० लाखांचा होता. पण कोरोनानंतर या फर्मचा टर्नओव्हर करोडो रुपयांमध्ये गेला. या दोन फर्मंना कोविड सेंटरमध्ये बेडशीट आणि गाद्या पुरवण्याचे कंत्राट देण्यात आले होते. यात मोठा घोटाळा झाला. हा घोटाळा मी दोन दिवसांत बाहेर काढणार होतो. याचा सुगावा त्यांना लागल्याने माझ्यावर हा हल्ला झाला असावा, असा संशय मनसे नेते संदिप देशपांडे यांनी व्यक्त केला आहे.
मनसे नेते संदीप देशपांडे यांच्यावर शिवाजी पार्क येथे शनिवारी सकाळी काही अज्ञात हल्लेखोरांनी त्यांच्यावर लोखंडी रॉड आणि स्टम्पने जीवघेणा हल्ला केला. त्यांना हिंदूजा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्यानंतर त्यांनी आज पत्रकार परिषदेत घेत सविस्तर माहिती दिली. इतकेच नव्हे तर त्यांनी हल्लेखोरांनाही इशारा दिला आहे.
या हल्ल्याचा संशय कोणावर आहे, असं विचारलं असता देशपांडे म्हणाले की, “मी माझ्याकडे असलेली सर्व माहिती पोलिसांना दिली आहे. मुंबई पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. आज सकाळी दोघांना अटक करण्यात आली. माझा मुंबई पोलिसांवर पूर्ण विश्वास आहे. त्यामुळे या प्रकरणाची पूर्ण चौकशी होईपर्यंत मी यावर बोलणं योग्य ठरणार नाही. चौकशीपूर्ण झाली की मी सविस्तर भूमिका मांडेन.
पण हा संपूर्ण घटनाक्रम पाहिला तर कोरोना काळात झालेल्या भ्रष्टाचारासंदर्भात आम्ही तक्रार केली होती. या प्रकरणात तपास यंत्रणांनी एकाला अटकही केली. त्याच्यानंतर ४८ तासांत माझ्यावर हा हल्ला झाला”, असा दावाही देशपांडे यांनी यावेळी केला. तसेच, या हल्ल्यानंतर खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा मला फोन आला होता. त्यांनी माझी विचारपूस करत माझ्या सुरक्षेसाठी दोन पोलीस कर्मचारी सुद्धा तैनात केले. पण माझी सरकारला विनंती आहे, की त्यांनी ही सुरक्ष काढून घ्यावी. सुरक्षा द्यायचीच असेल तर ज्यांनी माझ्यावर हल्ला केला त्यांना द्यावी” असा सूचक इशाराही देशपांडे यांनी यावेळी दिला.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.