युपीत मराठी भाषा शिकवण्याची मागणी; संदिप देशपांडे म्हणतात, आमचा विरोध नाही पण...

Krupashankar singh |BJP-MNS Politics| महाराष्ट्राचे भाजप नेते कृपाशंकर सिंह यांनी उत्तर प्रदेश सरकारला मराठीला पर्यायी भाषेचा दर्जा देण्याचे आवाहन केले आहे.
युपीत मराठी भाषा शिकवण्याची मागणी; संदिप देशपांडे म्हणतात, आमचा विरोध नाही पण...
Sandeep Deshpande News, Krupashankar Singh NewsSarkarnama

Sandeep Deshpande latest news

मुंबई : महाराष्ट्राचे भाजप (BJP) नेते कृपाशंकर सिंह (Krupashankar singh) यांनी उत्तर प्रदेश सरकारला मराठीला पर्यायी भाषेचा दर्जा देण्याचे आवाहन केले आहे. यासाठी त्यांनी यूपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना पत्र लिहून ही मागणी केली आहे. ''उत्तर प्रदेशातील माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यार्थ्यांसाठी पर्यायी भाषा म्हणून मराठीचा समावेश करण्याची विनंती केली आहे. मराठी बोलता आल्यास यूपीच्या विद्यार्थ्यांना महाराष्ट्रात (Maharashtra) चांगल्या नोकऱ्या मिळण्यास मदत होऊ शकते.'' असे सिंह यांनी म्हटले आहे.

त्यावर मनसे नेते संदिप देशपांडे यांनी प्रतिक्रीया दिली आहे. "कोणी मराठी भाषा शिकत असेल तर त्याला आमचा विरोध नाही. पण युपीतल्या शाळांमध्ये मराठी भाषेचा पर्याय देण्यापेक्षा तिथे रोजगाराची संधी उपलब्ध करुन दिल्यास उत्तर भारतीय नागरिकांना तिथेच रोजगार मिळेल आणि ते महाराष्ट्रात येण्याचा प्रश्नच उरणार नाही. भाषेच पर्याय देण्यापेक्षा त्यांना नोकऱ्यांचा पर्याय उपलब्ध करुन द्यावा,'' असे संदीप देशपांडे यांनी म्हटले आहे.

Sandeep Deshpande News, Krupashankar Singh News
नुपूर शर्माचं वक्तव्य महागात पडणार; अल् -कायदा दहशतवादी संघटनेची भारताला धमकी

यूपी सरकारची तत्वत: सहमती!

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी तत्त्वतः कृपाशंकर सिंह यांच्या मागणीला सहमती दर्शवली आहे. योगी आदित्यनाथ वाराणसीमध्ये प्रायोगिक तत्वावर मराठी भाषा शिकवण्याचा विचारात आहेत.

तर महाराष्ट्रात या पत्रामुळे महाराष्ट्रात मोठा वाद निर्माण होऊ शकतो, असेही बोलले जात आहे. कारण मनसेचा सुरवातीपासूनच महाराष्ट्रात उत्तर भारतीय आणि बाहेरील लोकांसाठी सरकारी नोकरीच्या संधींना विरोध करत आहे. तर शिवसेनेनेही महाराष्ट्रात नोकऱ्यांमध्ये भूमिपुत्रांच्या प्राधान्य देण्याची मागणी करत आली आहे,

भाजप नेत्याच्या मागणीकडे महाराष्ट्राचा संदर्भ म्हणून पाहिले पाहिजे, असे जाणकारांचे म्हणणे आहे. शिवसेना मनसेसोबत भूमिपुत्रांच्या प्रश्नावर आवाज उठवत असताना साहजिकच भाजपला परप्रांतियांना आकर्षित करण्यासाठी हा एक चांगला विषय होऊ शकतो, असे वाटते. विशेष म्हणजे काही महिन्यांत राज्यातील सर्वच पक्षांना महापालिका निवडणुका लढवायच्या आहेत आणि मुंबईसह उपनगरातही बहुसंख्य भोजपुरी भाषा बोलणारे आहेत जे सहसा यूपीमधून येतात, त्यामुळे यूपीमध्ये मराठी भाषा शिकवण्याची मागणी ही भाजपची राजकीय खेळी मानली जात आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in