बाळासाहेबांचे नाव कुणी वापरले तर माझे काय होईल, अशी भीती उद्धव ठाकरेंना आहे का ?

"मनसेचे सहा नगरसेवक फोडले, तेव्हा मराठी माणसांच्या पाठीत खंजीर खुपसण्याचं काम शिवसेनेनं केलं,"असा आरोप देशपांडे यांनी केला.
 MNS Sandeep Deshpande Latest News Updates, MNS Latest news
MNS Sandeep Deshpande Latest News Updates, MNS Latest newsSarkarnama

पुणे : सध्या राज्यात शिवसेनेतील बंडखोर नेते आणि शिवसेनेची झालेली अवस्था तसेच धनुष्यबाण आणि बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो या सर्वांवरून राजकारण सुरू आहे. शिवसेनेतील बंडखोर नेते सातत्याने बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाचा, फोटोचा वापर करीत आहेत. तर शिवसेनेतर्फे त्याला आक्षेप घेतला जात आहे. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनीही आपल्या मुलाखतीतून बंडखोरांना इशारा दिला आहे. (MNS Sandeep Deshpande Latest)

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सरचिटणीस संदीप देशपांडे (Sandeep Deshpande)यांनी यावरुन टि्वट करीत उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे. "काँग्रेसने कधीच दावा केला नाही की महात्मा गांधी त्यांचेच, हिंदू महासभा कधीच म्हणाली नाही की सावरकर आमचेच, बाबासाहेब आंबेडकर तर देशाचेच मग तुमच्या मनात हा पझेसिव्ह पणा का आहे ? हा पझेसिव्हनेस आहे की असुरक्षितता?"असे टि्वट त्यांनी केलं आहे.

"बाळासाहेबांचे नाव कुणी वापरले तर माझे काय होईल, याची भीती तुमच्या मनात आहे का? असा सवाल देशपांडे यांनी विचारला आहे. "बाळासाहेब महाराष्ट्राचे आहे, म्हणून मुंबईतील महापौर बंगला जनतेनं दिला आहे," असे देशपांडे म्हणतात.

"प्रत्येकवेळी मराठी माणसांबाबत भावनिक राजकारण करु नका, मनसेचे सहा नगरसेवक फोडले, तेव्हा मराठी माणसांच्या पाठीत खंजीर खुपसण्याचं काम शिवसेनेनं केलं,"असा आरोप देशपांडे यांनी केला.

 MNS Sandeep Deshpande Latest News Updates, MNS Latest news
Uddhav Thackeray : शिंदे उद्या मोदींचे पंतप्रधानपदही मागतील ; भाजपवाल्यांनो, सावधान !

शिवसेना पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे खरे राजकीय वारसदार कोण, असा वाद पूर्वीपासूनच चालत आला आहे. एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंड केल्यानंतर शिंदे गटातील आमदार बाळासाहेबांच्या विचारांचे वारसदार आहोत, असा दावा करीत आहेत, तर दुसरीकडे माजी मुख्यमंत्री, पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray)यांनी बंडखोरांना बाळासाहेबांचा नाव, फोटो वापरल्यावरुन आक्षेप घेतला आहे.

आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी सामनाच्या मुलाखतीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर (eknath shinde) टीकेचे बाण सोडले. ठाकरे म्हणाले, "शिंदेंनी अत्यंत वाईट पद्धतीने मुख्यमंत्रीपद मिळवले आहे. आता तर ते शिवसेनाप्रमुखांबरोबर तुलना करायला लागले,"

ठाकरे म्हणाले, 'ही आमची शिवसेना' म्हणून ते दावा करीत आहेत. हा अत्यंत घाणेरडा, दळभद्री प्रकार आहे. हे बघितल्यानंतर मला नाही वाटत, भाजप त्यांना कधी पुढे करील. नाही तर नंतर ते नरेंद्र भाईंशी तुलना करतील स्वतःची आणि पंतप्रधान पद मागतील. शेवटी लालसा, अशी घाणेरडी असते ना! ही चटक आहे," "भाजप किती भयंकर म्हणून त्यांनी भरसभेत मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. ती क्लिप फिरतेय. भाजप कसा शिवसैनिकांवर अन्याय-अत्याचार करतो ही ती क्लिप आहे. माझ्याच समोर त्यांनी तो राजीनामा दिला होता," असे ठाकरे यांनी सांगितले होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com