`समृद्धी`ला जोडणाऱ्या जालना-नांदेड महामार्गाला मंजुरी..

या संपुर्ण प्रकल्पासाठी ड्रोन, लिडार सर्वेला देखील मंजुरी देण्यात आली असून सदर प्रकल्पांचा तात्रिक व वित्तीय सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्यासाठी तांत्रिक सल्लागाराची नियुक्ती करण्याचे निर्देश देण्यात आले.
`समृद्धी`ला जोडणाऱ्या जालना-नांदेड महामार्गाला मंजुरी..
cm udhav thackeray-Ashok Chavan news aurangabad

औरंगाबाद ः हिंदुह्दयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गास जोडणाऱ्या जालना ते नांदेड या द्रुतगती महामार्गास अखेर मंजुरी देण्यात आली आहे. या संर्भात शासन निर्णय जारी करण्यात आला असून महामार्गाच्या बांधकामास मान्यता देण्यात आली असून तशा सूचना महाराष्ट्र रस्ते राज्य विकास महामंडळाला देण्यात आल्या आहेत. (Sanction for Jalna-Nanded Highway connecting Samrudhi Highway.) या महामार्गाला मंजुरी देऊन शासन आदेश जारी केल्याबद्दल राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आभार मानले आहे.

समृद्धी महामार्गाला जोडणाऱ्या जालना-नांदेड द्रुतगती महामार्गाचा शासन निर्णय जारी झाला आहे. या प्रकल्पाच्या संकल्पनेला उद्धवजी ठाकरे यांनी पहिल्या दिवसापासून संपुर्ण सहकार्य केले. (Chief Minister Uddhav Thackeray Maharashtra) या प्रकल्पाचा नांदेड, परभणी, हिंगोली या तीनही जिल्ह्यांना मोठा फायदा होणार असल्याचे ट्विट चव्हाण यांनी केले आहे. नागपूर-मुंबई हा समृद्धी महामार्ग राज्य सरकारचा महत्वाकांक्षी प्रकल्प आहे.

युती सरकारच्या काळात सुरू करण्यात आलेल्या या महामार्गाला दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्यात आले आहे. (Pwd Minister Ashok Chavan Maharashtra) राज्यात सत्तांतर झाल्यानंतर व उद्धव ठाकरे महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाल्यानंतर देखील या महामार्गाचे काम वेगाने सुरू आहे. मध्यंतरी सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी मुख्यमंत्र्यांकडे समृ्द्धी महामार्गाला नांदेड-जालना-हिंगोली हे जिल्हे देखील जोडण्याची मागणी केली होती.

या मागणी व चव्हाण यांच्या पाठपुराव्याला यश येऊन अखेर या संदर्भात शासन निर्णय जारी करण्यात आला आहे. त्यानूसार समृद्धी महामार्गाला जोडणाऱ्या जालना-नांदेड द्रुतगती महामार्ग तसेच नांदेड शहरातील हिंगोली गेट-बाफना चौक-देगलूर नाका ते छत्रपी चौक (धनेगाव जंक्शन) रस्त्याच्या सुधारणेसह, उड्डाणपुलाचे व गोदावरी नदीवरील पुलाचे बांधकाम करण्यास मान्यता देण्यात आली आहे.

या संपुर्ण प्रकल्पासाठी ड्रोन, लिडार सर्वेला देखील मंजुरी देण्यात आली असून सदर प्रकल्पांचा तात्रिक व वित्तीय सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्यासाठी तांत्रिक सल्लागाराची नियुक्ती करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. प्रकल्पांची अंतिम आखणी करून भूसंपादनाची प्रक्रिया सुरू करून त्यासाठीचे अंदाजपत्रक तयार करणे व महामंडळास निधी उपलब्ध करून देण्यास देखील मान्यता देण्यात आली आहे.

गोदवरी काठावर वसलेले नांदेड हे मराठवाड्यातील दुसरे महत्वाचे धार्मिक शहर आहे. शीखांचे दहावे गुरू गुरुगोविंदसिंहजी यांच्या पवित्र गुरुद्वारामुळे शीखांची दक्षिण काशी म्हणून देखील नांदेड ओळखले जाते. नांदेडला व्यापाऱ्याच्या दृष्टीने अनेक जिल्हे व राज्य जोडली गेलेली आहे. तेलंगणा, कर्नाटक राज्यात नांदेडमधून सर्वाधिक वाहतूक केली जाते. त्यामुळे नांदेडमधील वर्दळीचे रस्ते, उड्डाणपुल या प्रकल्पांतर्गत जालना-नांदेड द्रुतगती महामार्गात घेण्यात आली आहेत.

Edited By : Jagdish Pansare

Related Stories

No stories found.