निवृत्त न्यायाधीशांची समिती नेमा! समीर वानखेडेेंची उच्च न्यायालयात धाव

अमली पदार्थ प्रतिबंधक विभाग, मुंबईचे माजी विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्या अडचणी अजून संपलेल्या नाहीत.
निवृत्त न्यायाधीशांची समिती नेमा! समीर वानखेडेेंची उच्च न्यायालयात धाव
Sameer Wankhede  Latest Marathi NewsSarkarnama

मुंबई : अमली पदार्थ प्रतिबंधक विभाग, मुंबईचे (NCB) माजी विभागीय संचालक समीर वानखेडे यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. विभागीय जात प्रमाणपत्र पडताळणी समितीने जात प्रमाणपत्र रद्द का करू नये, अशी नोटीस त्यांना बजावली आहे. त्याला वानखेडे यांनी आव्हान दिलं असून ही नोटीस रद्द करण्याची मागणी केली आहे. तसेच या प्रकरणाची चौकशीसाठी निवृत्त न्यायाधीशांची समिती स्थापन करण्याची मागणीही त्यांनी केली आहे. (Sameer Wankhede Latest Marathi News Update)

वानखेडे यांचे जात प्रमाणपत्र बनावट असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक (Nawab Malik) यांनी केले होते. वानखेडे हे जन्माने मुस्लिम असून त्यांच्या वडिलांचे नाव ज्ञानदेव नसून दाऊद आहे, असा दावा मलिकांनी केला होता. त्यानंतर प्रमाणपत्राबाबत मुंबईच्या जिल्हा जात पडताळणी समितीकडे तक्रार करण्यात आली. समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांच्या जात प्रमाणपत्राबाबत सुनावणी सुरू आहे. याअंतर्गत समितीने 29 एप्रिल रोजी वानखेडे यांना कारणे दाखवा नोटीस बजावली. (Sameer Wankhedes plea in Mumbai High Court)

Sameer Wankhede  Latest Marathi News
वानखेडेेंचे जात प्रमाणपत्र रद्द होणार? थेट नोटीस पाठवल्यानं वाढल्या अडचणी

वानखेडे यांनी या नोटिसीविरोधात न्यायालयात धाव घेतली आहे. त्यामध्ये त्यांनी म्हटलं आहे की, जिल्हाधिकाऱ्यांनी महार जातीचे प्रमाणपत्र दिले असून अद्याप त्याला कोणत्याच यंत्रणेनं रद्द ठरवलेलं नाही. अनावधानाने झालेल्या चुकांमध्ये जन्म दाखला आणि शाळेतील नोंदीमध्ये वडिलांचे नाव दाऊद वानखेडे आणि धर्म मुस्लिम दिसत आहे. वडीलांच्या सेवेतही त्यांचं नाव ज्ञानदेव वानखेडे असेच आहे.

न्यायालयाने उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशांच्या नेतृत्वाखाली एक समिती नेणून जात प्रमाणपत्राची चौकशी करावी. किंवा याबाबतची चौकशी जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीकडून राष्ट्रीय अनुसुचित जाती आयोगाकडे हस्तांतरीत करावी, अशी मागणीही वानखेडे यांनी याचिकेत केली आहे. सुमारे शंभर पानांच्या या याचिकेत त्यांनी कारणे दाखवा नोटीस माझे म्हणणे ऐकून न घेता बजावल्याचे म्हटले आहे.

Sameer Wankhede  Latest Marathi News
ठाकरे सरकारला मोठा दिलासा; बहुसदस्यीय प्रभाग रचनेवर न्यायालयाची मोहोर

मलिक यांनी काय केला होता आरोप?

वानखेडे हे जन्माने मुस्लिम असून त्यांच्या वडिलांचे नाव ज्ञानदेव नसून दाऊद आहे, असा दावा मलिकांनी केला होता. त्यावरून राज्यात मोठं वादळ उठलं होतं. मलिकांच्या दाव्यानंतर वानखेडे यांच्यासह त्यांच्या नातेवाईकांकडून विविध कागदपत्रे सादर करण्यात आली. मलिकांनीही वानखेडे यांच्या पहिल्या विवाहाचे फोटो, निकाहनामा समोर आणले. हे प्रकरण केंद्रीय अनुसुचित जाती जमाती आयोगाकडेही गेले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.