Sameer Wankhede on CBI Raid: सीबीआय'च्या छापेमारीवर समीर वानखेडेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, मी देशभक्त...

Sameer Wankhede - CBI Raid: भ्रष्टाचाराचा गुन्हा देखील दाखल केला गेला आहे.
Sameer Wankhede
Sameer Wankhede Sarkarnama

Sameer Wankhede News : बॉलीवूड अभिनेता शाहरूख खान यांचा मुलगा आर्यन खानला ड्रग्ज प्रकरणी अटक करणारे आयआरएस अधिकारी समीर वानखेडे यांच्याच घरावर दोन दिवसांपुर्वी सीबीआयने छापा टाकला. बेहिशोबी मालमत्ता बाळगल्याप्रकरणी त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आल्याचे सांगण्यात आले.आता या प्रकरणात इतर काही अधिकारी आणि खासगी लोकांचीही नावे समोर आली आहेत. तर देशभक्त असल्यानेच आपल्याला ही शिक्षा करण्यात आल्याची प्रतिक्रिया वानखेडे यांनी दिली आहे. (Sameer Wankhede's first reaction to CBI raids, said, I am a patriot)

सीबीआयने काल माझ्या निवासस्थानावर छापा टाकला आणि १२ तासांपेक्षा जास्त वेळ झडती घेतली. या कारवाईत त्यांना १८ हजार रुपये आणि मालमत्तेची चार कागदपत्रे सापडली. मी सेवेत सामील होण्यापूर्वी ही मालमत्ता खरेदी करण्यात आली होती. पण देशभक्त असल्याची मला ही शिक्षा मिळत आहे.सहा अधिकाऱ्यांच्या पथकाने अंधेरीतील माझ्या वडिलांच्या घरावर छापा टाकला पण त्यांना काहीही सापडले नाही. सीबीआयच्या सात अधिकाऱ्यांच्या आणखी एका पथकाने माझ्या सासरच्या घरी छापे टाकले. माझ्या दोन्ही घरातील लोक वृद्ध आहेत. (Sameer Wankhede CBI Raid)

Sameer Wankhede
CBI Raid On Sameer Wankhede: नवाब मलिकांसह शाहरूख खानला अडचणीत आणणाऱ्या समीर वानखेडेंच्या घरावर सीबीआयचे छापे!

तसेच, सीबीआयने त्यांची बहीण यास्मिन वानखेडे आणि वडील ज्ञानेश्वर वानखेडे यांच्या घरातून 28-28 हजार रुपये जप्त केले. वानखेडे यांच्या सासरच्या घरातूनही 1800 रुपये जप्त करण्यात आले. पत्नी आणि मुलांच्या उपस्थितीत त्यांच्या निवासस्थानी तब्बल 12 तास तपास पथक कारवाई करत होते.इतकेच नव्हे तर त्यांची पत्नी मराठी अभिनेत्री क्रांती रेडकर यांचा फोन सीबीआय अधिकाऱ्यांनी हिसकावून घेतल्याच वानखेडे यांनी म्हटलं आहे. (CBI Raid )

दरम्यान, दोन वर्षापुर्वी 2 ऑक्टोबर 2021 रोजी कॉर्डेलिया क्रूझ जहाजावर छापा टाकत वानखेडे यांनी शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याला ड्रग्ज बाळगल्याबद्दल अटक केली होती. यावेळी ते एनसीबीचे प्रमुख अधिकारी होते. न्यायालयातून आर्यन खानला जामीन मिळाला. आणि त्याच्यावरील ड्रग्जचा खटला मागे घेण्यात आला. याप्रकरणातून आर्यनची निर्दोष मुक्तताही करण्यात आली.

Edited By- Anuradha Dhawade

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com