Sameer Wankhede Summoned: महागडी घड्याळं, परदेशी प्रवासाचा हिशेब द्या ! ; वानखेडेंना CBI समोर..

CBI Summons to Sameer Wankhede: तक्रारीमध्ये समीर वानखेडे, विश्व विजय सिंग आणि आशिष रंजन या तीन एनसीबीच्या अधिकाऱ्यांचा समावेश आहे.
CBI summons to Sameer Wankhede
CBI summons to Sameer Wankhede Sarkarnama

CBI Summons to Sameer Wankhede : एनसीबी मुंबई विभागाचे तत्कालीन विभागीय संचालक, भारतीय महसूल सेवेतील अधिकारी (IRS) समीर वानखेडे यांना केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने चौकशीसाठी उपस्थित राहण्याचे समन्स बजावण्यात आले आहे. त्यामुळे वानखेडे यांचा पाय आणखी खोलात असल्याचे सध्याचे चित्र आहे. (Sameer Wankhede summoned for questioning attendance on may 18 cbi summons)

'किंगखान'अभिनेता शाहरूख खान याच्याकडून 25 कोटींची खंडणी मागितल्याच्या आरोपापासून ते महागडी घड्याळं, परदेशी प्रवास यांचा हिशेबही समीर वानखेडे देऊ शकले नाहीत, या प्रकरणी वानखेडेंसह अन्यजणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. वानखेडे यांच्या विरोधात ११ मे रोजी सीबीआयने गुन्हा दाखल केला आहे. सीबीआयने उद्या (१८ मे) त्यांना हजर राहण्याचा आदेश दिला आहे.

CBI summons to Sameer Wankhede
BJP News : भाजपच्या लाटेत सपाच्या अडीच हजार उमेदवारांची अनामत रक्कम जप्त ; काँग्रेस, बसपा, आपच्या..

गुन्हेगारी कट रचणं, धमकीद्वारे खंडणी मागणं, सरकारी कर्मचाऱ्यानं लाच घेणं, सरकारी कर्मचारी असल्याचा भ्रष्टाचारी आणि अवैध गोष्टींसाठी फायदा घेणं, मौल्यवान वस्तू कुणालाही न सांगता मिळवणं, आदी तक्रारी वानखेडेंच्या विरोधात दाखल केलेल्या तक्रारी करण्यात आल्या आहेत. या तक्रारीमध्ये समीर वानखेडे, विश्व विजय सिंग आणि आशिष रंजन या तीन एनसीबीच्या अधिकाऱ्यांचा समावेश आहे.

मुंबईतील कॉर्डिलिया क्रुझवर दोन वर्षापूर्वी झालेल्या पार्टीत वानखेडे यांच्या नेतृत्त्वाखालील पथकाने बॉलीवूड किंग शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याला अटक केली होती.

या कारवाईमुळे समीर वानखेडे चांगलेच चर्चेत आले होते. कोरोना काळातही ड्रग्ज प्रकरणात अनेक धाडी टाकून वानखेडेंनी आपला दरारा निर्माण केला होता. तर आर्यनलाही अनेक महिने तुरुंगात राहावे लागले होते.

CBI summons to Sameer Wankhede
Maharashtra Politics : मोठी बातमी : मंत्रिपद हवयं ; पावणेदोन कोटी द्या ; BJP च्या सहा आमदारांची फसवणूक..

वानखेडें यांच्यावरील कारवाईनंतर त्यांच्यावर अनेक प्रश्न उपस्थित झाले. समीर वानखेडे यांनी जाणीवपूर्वक आर्यन खानला याप्रकरणात अडकवल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी केला.

नवाब मलिक यांनी हे प्रकरण लावून धरल्यानंतर ड्रग्ज प्रकरणात आर्यनला केलेली अटक म्हणजे एक कट असल्याचे निष्पन्न झाले. वानखेडेंनी नवी मुंबईतील अवैधरित्या मिळवलेल्या बार परवान्याचे प्रकरणही समोर आले. या सर्व प्रकरणामुळे वानखेडेंची एनसीबीच्या विभागीय संचालकपदावरून उचलबांगडी करण्यात आली होती.

(Edited By : Mangesh Mahale)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com