सतराव्या वर्षी काढलेल्या बारच्या परवान्यानं वानखेडेंना आता आणलं अडचणीत

अमली पदार्थ प्रतिबंधक विभागाचे विभागीय संचालक समीर वानखेडे हे आता राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या रडारवर आले आहेत.
Sameer Wankhede
Sameer WankhedeSarkarnama

मुंबई : अमली पदार्थ प्रतिबंधक विभागाचे (NCB) विभागीय संचालक समीर वानखेडे (Sameer Wankhede) हे आता राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या (State Excise Department) रडारवर आले आहेत. मुंबईत वानखेडे यांचा एक रेस्ट्रो बार आहे. वानखेडे यांनी 17 वर्षांचे असताना या बारचा परवाना घेतला होता. या प्रकरणी उत्पादन शुल्क विभागाने ठाण्याचे जिल्हाधिकारी आणि ठाण्याचे उत्पादन शुल्क अधीक्षक यांना कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत.

नवी मुंबईत सद्गुरू नावाने हा रेस्ट्रो बार आहे. समीर वानखेडे यांचे वडील उत्पादन शुल्क विभागात होते. वाशी येथे 1997-98 मध्ये सद्गुरू रेस्ट्रो बार सुरू करण्यात आला. त्याचा परवाना 27 ऑक्टोबर 1997 रोजी समीर वानखेडे यांच्या नावाने घेण्यात आला. त्यावेळी वानखेडे यांचे वय 17 वर्षे 10 महिने होते. हा परवाना 2022 पर्यंत वानखेडे यांच्या नावावर आहे. बारचा परवाना मिळवण्यासाठी वयाची अट 21 वर्षे आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाने ठाण्याचे जिल्हाधिकारी आणि उत्पादन शुल्क अधीक्षक यांच्याकडे हे नेमके कसे घडले याविषयी विचारणा केली होती.

उत्पादन शुल्क विभागाची प्राथमिक चौकशी संपली असून, या प्रकरणी ठाण्याचे जिल्हाधिकारी आणि ठाण्याचे उत्पादन शुल्क अधीक्षक यांना कारवाईचे निर्देश देण्यात आले आहेत. यानुसार, वानखेडे यांनी 17 व्या वर्षी बारचा परवाना मिळवला. त्यांच्यावर महाराष्ट्र प्रतिबंध कायद्याच्या कलम 54 नुसार कारवाई होऊ शकते. त्यांचा परवाना रद्द केला जाऊ शकतो. यासाठी वानखेडे यांनी परवाना घेताना खोटी कागदपत्रे सादर केली हे सिद्ध करावे लागेल, अशी माहिती सूत्रांनी दिली.

Sameer Wankhede
अमित शहांच्या डावावर काँग्रेसचा प्रतिडाव अन् वाद सर्वोच्च न्यायालयात

याबाबत मलिकांनी पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली होती. ते म्हणाले होते की, कमी वयाच्या मुलाच्या नावाने परवाना घेण्यात आला. 18 वर्षाच्या खालील लोकांना परवाना दिला जात नाही. शासकीय अधिकारी शासन नोकरी करत असताना व्यवसाय करू शकत नाही. हा नियमभंग आहे. आता तरी त्यांच्यावर कारवाई करावी. त्यांना अजून वाचवलं तर केंद्र आणि भाजप त्यांना वाचवत आहे, असा त्याचा अर्थ होईल.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com