आर्यनला क्लीनचीट; समीर वानखेडेंच सूचक ट्विट

Aryan Khan| Sameer Wankhede| NCB| आर्यन खानवर केलेल्या कारवाईमुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी समीर वानखेडे यांच्यावर गंभीर आरोप केले होते.
आर्यनला क्लीनचीट; समीर वानखेडेंच सूचक ट्विट
Sameer Wankhede News, Sameer Wankhede's tweet on Aryan Khan, Aryan Khan news

मुंबई : बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा (Shahrukh Khan) मुलगा आर्यन खानला (Aryan Khan) ड्रग्जप्रकरणी क्लीनचीट मिळाली. एनसीबीचे तत्कालीन झोनल डायरेक्टर समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांनी आर्यनवर कारवाई केली होती. आर्यनची सुटका झाल्यानंतर आता या प्रकरणी समीर वानखेडेंच्या अडचणी वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. (Sameer Wankhede News in Marathi)

केंद्र सरकारने वानखेडेंवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिलेत. त्यामुळे त्यांच्या नोकरीही अडचणीत येऊ शकते अशी माहिती समोर आली आहे. यावर समीर वानखेडे यांनी एक सूचक ट्विट केलं असून आपण नकारात्मकडे लक्ष देत नसून सकारात्मकतेने काम करत असल्याचं म्हटलं आहे.

Sameer Wankhede News, Sameer Wankhede's tweet on Aryan Khan, Aryan Khan news
महाडिकांनी वाढविले शिवसेनेचे टेन्शन : विजयासाठीच्या १० मतांची व्यवस्था झालीय

“मी कधीही नकारात्मक गोष्टींकडे लक्ष देत नाही. कारण जर तूम्ही या नकारात्मक गोष्टींकडे लक्ष देत बसलात तर तुमची प्रगती होणार नाही. मी नेहमी कोणत्याही गोष्टीची सकारात्मक बाजू पाहातो. ज्यामुळे मी कायम पॉझिटिव्ह राहातो. असं वानखेडे यांनी म्हटलं आहे. याचवेळी त्यांनी #समीरवानखेडे”, असं हॅशटॅगही दिलं आहे.

दरम्यान, आर्यन खानला क्लिनचीट मिळाल्यानंतर समीर वानखेडे यांना आर्यन खानबाबत प्रश्न विचारला असता त्यांनी त्यांनी सुरुवातीला सॉरी, म्हणत मला या प्रकरणी कोणतीच प्रतिक्रिया द्यायची नाहीये. मी आता एनसीबीमध्ये नाही. तुम्ही एनसीबी अधिकाऱ्यांशी बोला, अशी प्रतिक्रिया समीर वानखेडे यांनी दिली.

आर्यन खानवर केलेल्या कारवाईमुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी समीर वानखेडे यांच्यावर गंभीर आरोप केले होते. आर्यन खानवर खोटे आरोप लावल्याचा दावाही मलिकांनी केला होता. तसेच एनसीबीने या प्रकरणाच्या चौकशीसाठी नेमलेल्या एसआयटीनेही आर्यन खानला क्लीनचीट दिली होती. त्यानंतर समीर वानखेडेंची एनसीबीच्या विभागीय संचालकपदावरुन उचलबांगडी करण्यात आली होती.

या प्रकऱणी आता आर्यन खानला क्लीनचीट मिळाल्यानंतर आता वानखेडेंना पदावरुन हटवण्याची येण्याची शक्यता असल्याची माहिती केंद्रसरकामधील सूत्रांकडून मिळाली आहे. या प्रकरणात आता वानखेडे यांची चौकशी होणार आहे. या चौकशीत जर वानखेडे यांनी सहकार्य केलं नाही आणि समाधानकारक उत्तरं दिली नाहीत, तर त्यांच्यावर कठोर कारवाई होण्याची शक्यता असल्याचं बोललं जात आहे. इतकचं नाही तर चौकशी समितीकडून त्यांची पगारवाढ रोखण्यासोबत त्याना बडतर्फ करण्याची मागणीही होऊ शकते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in