Aryan Khan Case : समीर वानखेडेंची गेल्या दोन तासांपासून सीबीआयकडून चौकशी : जाताना म्हणाले ‘सत्यमेव जयते’

मुंबईतील बीकेसीमधील कार्यालयात सीबीआयकडून त्यांचा जबाब नोंदविण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.
Aryan Khan Case
Aryan Khan Case Sarkarnama

मुंबई : नार्को टेस्ट कंट्रोल ब्यूरोचे मुंबई विभागाचे माजी संचालक समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांची गेल्या दोन तासांपासून केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाकडून (सीबीआय) चौकशी सुरू आहे. मुंबईतील बीकेसीमधील कार्यालयात सीबीआयकडून त्यांचा जबाब नोंदविण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. चौकशीला समोरे जाताना वानखेडेंच्या हातात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे चरित्र होते. तसेच, कार्यालयात पोचण्यापूर्वी त्यांनी ‘सत्यमेव जयते’ अशी प्रतिक्रिया दिली आहे. (Sameer Wankhede has been interrogated by CBI for the last two hours)

शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला ड्रग्ज प्रकरणातून (Aryan Khan Case ) सोडविण्यासाठी २५ कोटी रुपये मागितल्याचा आरोप समीर वानखेडे यांच्यावर आहे. त्याप्रकरणी नार्को टेस्ट कंट्रोल ब्यूरोच्या अहवालानुसार सीबीआयने वानखेडे यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. सीबीआय फक्त आर्यन खान प्रकरणात खंडणी आणि खोटा गुन्ह्याच तपास करत नाही तर वानखेडे यांची कथित मालमत्तेच्या संदर्भात चौकशी सुरू केली आहे.

Aryan Khan Case
Maharashtra Politic's : मलाही एकनाथ शिंदेंकडून ऑफर होती : शिवसेना नेत्याचा गौप्यस्फोट

वानखेडे जेव्हा सीबीआयच्या कार्यालयात पोचले, त्यावेळी त्यांच्या हातात डॉ. बाबसाहेब आंबेडकर यांच्या चरित्राची एक प्रत होती. यावेळी ‘आता निघालो आहे, मी सीबीआय ऑफीसला. मला कायच म्हणायचे नाही. फक्त सत्यमेव जयते म्हणायचे आहे, मला. सर्वकाही सीबीआयच्या ऑफीसमध्ये सांगणार आहे. चौकशीत सीबीआयला संपूर्ण सहकार्य करणार आहे, असेही त्यांनी म्हटले आहे.

Aryan Khan Case
Ashish Deshmukh News : फडणवीस पोहोचले आशिष देशमुखांच्या घरी, देशमुख म्हणाले...

दरम्यान, अंमली पदार्थ नियंत्रण कक्षाचे मुंबई विभागाचे माजी संचालक समीर वानखेडे यांना मुंबई उच्च न्यायालयाने तात्पुरता दिलासा दिला आहे. समीर वानखेडे यांच्या याचिकेवर उच्च न्यायालयात सुनावणी झाली. त्यावेळी न्यायालयाने वानखेडेंना 24 मे पर्यंत अटकेपासून संरक्षण दिलं आहे. दरम्यान, आर्यन खान याला अटक केल्यानंतर त्या दरम्यान समीर वानखेडे आणि शाहरूख खान यांच्यातला व्हॉट्स अॅपवरील संवाद समोर आला आहे.

Aryan Khan Case
Sameer Wankhede News : वानखेडे भाजपचे कोण लागतात? आरएसएसच्या मुख्यालयात येऊन ते कोणाला भेटले? : पटोलेंचा सवाल

शाहरुख खान आणि समीर वानखेडे यांच्यातील व्हॉट्स अप संभाषण

शाहरुख -

"ही घटना आर्यनच्या आयुष्याला कलाटणी देणारी ठरेल. या देशाला पुढे नेण्यासाठी प्रामाणिक आणि कष्टाळू तरुणांची गरज आहे. तुम्ही आणि मी आपण हे केले आहे आता पुढील पिढीने याचे पालन केले पाहिजे. ते भविष्यासाठी तयार करणे आपल्या हातात आहे. तुमच्या दयाळूपणाबद्दल आणि समर्थनाबद्दल पुन्हा एकदा धन्यवाद. प्रेम srk

वानखेडे -

माझ्या शुभेच्छा

शाहरुख -

धन्यवाद. तू चांगला माणूस आहेस. आज मी विनंती करतो की त्याच्यावर कृपा करा. प्रेम srk

वानखेडे -

नक्की, काळजी करू नकोस

शाहरुख -

देव तुम्हाला आशीर्वाद देईल. तुम्ही सांगाल तेव्हा मी वैयक्तिकरित्या यायला तयार आहे आणि मी तुम्हाला मिठीही मारेल. कृपया तुमच्या सोयीनुसार वेळ कळवा.

Aryan Khan Case
Congress Leader News : गाडीची स्मशानभूमीत पूजा...२०२३ क्रमांक अन्‌ कर्नाटकात सत्ता : काँग्रेसच्या बड्या नेत्याचा संकल्प अखेर पूर्ण

शाहरुख खान -

कायद्याच्या सीमा असतात. मी तुम्हाला विनवणी करतो, कृपया त्याला त्या तुरुंगात राहू देऊ नका. तो माणूस म्हणून कोलमडून पडेल. काही स्वार्थी लोकांमुळे त्याचा आत्मा नष्ट होईल. तुम्ही मला वचन दिले होते. माझ्या मुलाला अशा ठिकाणी ठेवणार नाही, जिथे तो कोलमडून बाहेर येईल. यात त्याचा काही दोष नाही, काही स्वार्थी लोक ते करत आहेत. एक चांगला माणूस म्हणून तुम्ही अशा लोकांना साथ देऊ नका. मी तुम्हाला वचन देतो की मी काहीही करायला तयार आहे. त्यांना काहीही देण्यास तयार आहे. पण कृपया माझ्या मुलाला घरी पाठवा. तुम्हाला हे देखील माहित आहे की, तुमच्या हृदय त्याच्यासाठी खूप कठोर झाले आहे. कृपा करून एक बाप म्हणून विनवणी करतो.

वानखेडे - शाहरुख मी तुला एक चांगला माणूस म्हणून ओळखतो.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in