मुख्यमंत्र्यांशी सविस्तर चर्चा, पुढे काय करायचं ते ठरलंय! संभाजीराजेंच्या गुगलीनं उत्सुकता शिगेला

संभाजीराजे यांनी राज्यसभेसाठी अपक्ष उमेदवारी अर्ज भरण्याची घोषणा काही दिवसांपूर्वी केली आहे.
CM Uddhav thackeray, SambhajiRaje Chhatrapati Latest Marathi News
CM Uddhav thackeray, SambhajiRaje Chhatrapati Latest Marathi NewsSarkarnama

कोल्हापूर : माजी खासदार संभाजीराजे छत्रपती (Sambhajiraje Chhatrapati) यांनी राज्यसभा निवडणुकीबाबत मंगळवारी गुगली टाकली. निवडणूक अपक्ष लढविणार की शिवबंधन हाती बांधणार याबाबत त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली नाही. पण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी सविस्तर चर्चा झाली असून पुढे काय करायचं ते ठरलेले आहे, असं सांगत त्यांनी उत्सुकता वाढवली आहे. (Sambhajiraje Chhatrapati Latest Marathi News)

शिवसेनेकडून राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी संभाजीराजेंना शिवबंधन हाती बांधण्याचा प्रस्ताव दिला आहे. शिवसेना पुरस्कृत उमेदवार म्हणून निवडणूक लढवावी, यासाठी ठाकरेंनी त्यांच्या भेटीत गळ घातली आहे. पण यावर संभाजीराजेंकडून आपली भूमिका स्पष्ट करण्यात आलेली नाही. (Rajya Sabha Election Latest Marathi News)

CM Uddhav thackeray, SambhajiRaje Chhatrapati Latest Marathi News
शिवसेना देणार ज्येष्ठांना धक्का? राज्यसभेसाठी संजय पवारांच्या नावाची चर्चा

या चर्चेदरम्यान मंगळवारी त्यांनी अनेक दिवसांनी पहिल्यांदाच माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, 'माझी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी सविस्तर चर्चा झाली आहे. सविस्तर बोलणे झाले आहे. पुढे काय करायचं, ते सविस्तर ठरलेलं आहे. मला पूर्ण विश्वास आहे, ते त्याप्रमाणे करतील. मला हाही विश्वास आहे की, ते छत्रपती घराण्याचा सन्मान करतील.' एवढंच बोलून संभाजीराजेंनी उत्सुकता वाढवली आहे.

दरम्यान, माध्यमांशी बोलण्याआधी संभाजीराजे यांनी कुटुंबीयांशीही चर्चा केल्याचे समजते. कुटुंबीयांशी बोलल्यानंतर त्यांनी आपली भूमिका ठरवल्याचे सांगितले जात आहे. त्यांच्या वक्तव्यामुळे त्यांनी शिवसेनेकडेच चेंडू टोलवल्याचेही बोलले जात आहे. त्यामुळे संभाजीराजे यांच्यासह शिवसेनेवरही दबाव आहे.

CM Uddhav thackeray, SambhajiRaje Chhatrapati Latest Marathi News
संभाजीराजे यांना एकमेव आधार उरला तो मित्र मानलेल्या फडणविसांचा!

संजय पवार यांच्या नावाची चर्चा?

राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी चुरस वाढली आहे. संजय पवार हे कोल्हापूरचे जिल्हा प्रमुख आहेत. कट्टर शिवसैनिक म्हणून परिचित असलेले पवार हे मागील 25 ते 30 वर्षांपासून पक्षात सक्रीय आहेत. संभाजीराजे यांनी नकार दिल्यास कोल्हापूरातीलच उमेदवार देण्यावर शिवसेनेच गांभीर्याने विचार सुरू आहे. त्यासाठी संजय पवार यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू आहे. नेत्यांशी दांडगा संपर्क असलेले संजय पवार ग्रामीण भागातील असून शिवसेनाही ग्रामीण चेहऱ्याच विचार करत आहे.(Shiv Sena Leader Sanjay Pawar may be the Rajya Sabha Candidate)

दबाव वाढवण्याचा प्रयत्न

दरम्यान, राज्यसभेत जाण्यासाठी इच्छुक असलेल्या छत्रपती संभाजीराजे यांचा मार्ग सुकर व्हावा, यासाठी आता मराठा संघटनांनी (Maratha organisation) व्‍यूहरचना करण्‍यास सुरुवात केली आहे. संभाजीराजे यांना अपक्ष म्हणून पाठिंबा देण्यास नकार दिल्याचा सेनेला राजकीय फटका बसेल, असे हे समर्थक सांगत आहेत. मराठा समाज सेनेच्या विरोधात जाऊ शकतो, अशी मांडणी हे कार्यकर्ते करत आहेत. त्यासाठी सेनेतील मराठा नेत्यांना, आमदारांना भेटून ते भूमिका मांडत आहेत. अर्थात त्यांच्या दबावाला पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे कितपत प्रतिसाद देणार याची साशंकता आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com