Sambhajiraje Chhatrapati :''... आणि मग राज्यपाल छत्रपतींचा अवमान करुनही उघड माथ्याने कसे फिरताहेत?

Sambhajiraje Chhatrapati : ...हा कुठला न्याय आहे?
The government is keeping an eye on me says Sambhajiraje Chatrapati
The government is keeping an eye on me says Sambhajiraje Chatrapati

Sambhajiraje Chhatrapati News : पुणे दौऱ्यावर असलेल्या राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना 'स्वराज्य'संघटनेच्या कार्यकर्त्यांनी काळे झेंडे दाखवले. यावेळी पोलिसांनी कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. यावरुनच माजी खासदार व स्वराज्य संघटनेचे अध्यक्ष संभाजीराजे छत्रपती आक्रमक झाले असून त्यांनी राज्य सरकारवर आगपाखड केली आहे.

संभाजीराजे छत्रपती यांनी पोलिसांच्या कारवाईवर टिवि्टद्वारे संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. संभाजीराजे म्हणाले, काळे झेंडे दाखवले म्हणून स्वराज्यच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं, मग राज्यपाल कोश्यारी हे छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करुनही उघड माथ्याने कसे फिरत आहेत? असा संतप्त सवाल संभाजीराजे (Sambhajiraje Chhatrapati) यांनी उपस्थित केला आहे.

The government is keeping an eye on me says Sambhajiraje Chatrapati
Udayanraje : नरेंद्र पाटलांची बुद्धी भ्रष्ट झाली असेल…

पुण्यात स्वराज्य संघटनेच्या कार्यकर्त्यांनी प्रवक्ते धनंजय जाधव यांच्या नेतृत्वाखाली राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना काळे झेंडे दाखवले. यावेळी 'राज्यपाल हटवा, अस्मिता वाचवा', 'छत्रपती शिवाजी महाराज की जय' अशा जोरदार घोषणा देत राज्यापालांच्या वक्तव्याचा निषेध व्यक्त केला.या आंदोलनावेळी पुणे पोलिसांनी स्वराज्य संघटनेच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं. याच कारवाईमुळे संभाजीराजे संतापले आहे.

The government is keeping an eye on me says Sambhajiraje Chatrapati
Ajit Pawar: अजितदादांनी राज ठाकरेंना करून दिली 'त्या' मुलाखतीची आठवणं...

छत्रपती संभाजीराजे यांनी काळे झेंडे दाखवले म्हणून स्वराज्यच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले, मग कोश्यारी छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करून उघड माथ्याने कसे फिरत आहेत? असा सवाल संभाजीराजेंनी विचारला. आमच्या दैवतांचा, महापुरुषांचा अवमान करून कोश्यारी उघड माथ्याने राज्यात फिरतात, त्यांच्यावर कोणतीही कारवाई होत नाही. उलट त्यांच्या वक्तव्याचा संविधानिक मार्गाने निषेध केला तरी पोलिस कारवाई करतात. हा कुठला न्याय आहे? अशी संतप्त प्रतिक्रिया त्यांनी दिलेली आहे

राज्यपालांना काळे झेंडे दाखवले म्हणून अटक! आणि देशाची अस्मिता असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अवमानकारक बोलणाऱ्या कोश्यारींना सुरक्षा! हा कोणता न्याय? असा सवालही संभाजीराजे यांनी यावेळी उपस्थित केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com