Sambhajiraje Chhatrapati : शंभर वर्षांपूर्वी शाहू महाराजांना त्रास दिला, तोच प्रकार महाराष्ट्रात आता सुरू; वेदोक्त प्रकरणावरून राजे आक्रमक !

Sambhajiraje Chhatrapati : "शाहू-फुले-आंबेडकरांच्या महाराष्ट्रात अशी लोकं निर्माण का होत आहेत? "
Chhatarapatti Sambhajiraje
Chhatarapatti Sambhajirajesarkarnama

Kolhapur News : नाशिक जिल्ह्यातील काळाराम मंदिरात आपल्याला वेदोक्त मंत्र म्हणण्यास तेथील महंतांनी विरोध केला, असा खळबळजनक आरोप संभाजीराजे छत्रपती (Sambhajiraje Chhatrapati) यांच्या पत्नी संयोगिताराजे यांनी केला होता. याबाबत सोशल मिडीयावर त्यांनी पोस्ट लिहली होती. यानंतर एकच वादंग उठले होते. आता संभाजीराजे यांनी या प्रकरणावर भाष्य केले आहे. या प्रकरणी त्यांनी पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे.

Chhatarapatti Sambhajiraje
Karnatak Election : कर्नाटकसाठी भाजपचा मेगा प्लॅन : 40 स्टार प्रचारकांसह उतरणार मैदानात !

संभाजीराजे म्हणाले,"संयोगिताराजे या नेहमी सत्याच्याच बाजू घेऊन बोलत असतात. जे त्यांना पटले नाही, ते त्यांनी परखडपणे बोलून दाखवले. नाशिकच्या काळाराम मंदिरात त्यांना जो अनुभव आला, तो त्यांनी जाहीरपणे मांडला. त्यांच्या परखडपणे व्यक्त होण्याचा मला सार्थ अभिमान वाटतो."

Chhatarapatti Sambhajiraje
Sambhajinagar Dangal : राज्याची परिस्थिती पाहता चिंता वाटायला लागली; दंगलींच्या पार्श्वभूमीवर पवारांचे विधान!

ते पुढे म्हणाले, "महाराष्ट्र राज्य हे शाहू-फुले-आंबेडकरांच्या विचारांना घेऊन चालणारे राज्य आहे. अशा महाराष्ट्रात अशी कृत्ये करणारे का निर्माण होत आहेत, तेच कळत नाही. प्रत्येकाला मंदिरात जाऊन दर्शन घेण्याचा अधिकार आहे. १०० वर्षांपूर्वी राजर्षी शाहू महाराजांना आणि इतर ही महापुरूषांना जोत्रास दिला गेला, तोच प्रकार पुन्हा सुरू झाला आहे, यापुढे अशा गोष्टी पुन्हा घडू नयेत,” असेही ते म्हणाले.

काय आहे प्रकरण?

नाशिक जिल्ह्यातील काळाराम मंदिरात आपल्याला वेदोक्त मंत्र म्हणण्यास तेथील महंतांनी विरोध केला, असा खळबळजनक आरोप संयोजिताराजे यांनी केला होता.

“नाशिकच्या काळाराम मंदिरातील तथाकथित महंतांनी माझ्या पूजेसाठी पुराणातील मंत्र म्हणण्याचा प्रयत्न केला. मात्र, कोल्हापूरच्या छत्रपती घराण्याच्या वारशामुळे मी ठामपणे विरोध केला. अनेक कारणे देऊन त्यांनी मला वेदोक्त मंत्राचा अधिकार कसा नाही, हे सांगायचा प्रयत्न केला. शेवटी मी विचारले की, ज्या मंदिरांमध्ये तुम्ही आजच्या काळातही जे नियम लावत आहात, ती मंदिरे वाचविली कोणी? छत्रपतींनी वाचविली! मग छत्रपतींना शिकवण्याचे धाडस करू नका. पण तरीही मी महामृत्युंजय मंत्राचा जप का केला म्हणून त्यांनी प्रश्न केलाच,” असे त्यांनी पोस्टमध्ये नमूद केले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com