...हे गुजरातमध्ये होऊ शकते, मग महाराष्ट्रात का नाही?

संभाजीराजे यांनी नुकतीच 'स्टॅच्यू ऑफ युनिटी'ला भेट दिली होती.
...हे गुजरातमध्ये होऊ शकते, मग महाराष्ट्रात का नाही?
Sambhaji Raje Chhatrapatisarkarnama

मुंबई : गुजरातमधील सरदार वल्लभभाई पटेल यांचा १८२ मीटर उंच पुतळा 'स्टॅच्यू ऑफ युनिटी' चे खासदार संभाजीराजे छत्रपती (Sambhaji Raje Chhatrapati) यांनी कौतुक केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या संकल्पनेतून साकारलेले हे स्मारक खरोखरीच सरदार पटेल यांचे कार्य जागतिक पातळीवर पोहोचवत आहे. संभाजीराजे यांनी नुकतीच 'स्टॅच्यू ऑफ युनिटी'ला भेट दिली होती. त्याचे फोटो त्यांनी ट्वीट केले आहेत. त्यासोबत हे गुजरातमध्ये होऊ शकते, मग महाराष्ट्रात का नाही? असा सवालही त्यांनी केला आहे.

Sambhaji Raje Chhatrapati
भाजपचं जशास तसं उत्तर! विरोधकांचे 4 आमदार फोडून दिला मोठा धक्का

संभाजीराजे यांनी फोटो ट्विटर अकाऊंटवर शेअर केले आहेत. त्यासोहतच त्यांनी गुजरात सरकारचे कौतुक केले आहे. ते म्हणाले ''...हे गुजरातमध्ये होऊ शकते, मग महाराष्ट्रात का नाही? लोहपुरूष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या 'स्टॅच्यू ऑफ युनिटी' या स्मारकास भेट दिली. नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून साकारलेले हे स्मारक खरोखरीच सरदार पटेल यांचे कार्य जागतिक पातळीवर पोहोचवत आहे''

''हे स्मारक साकारण्यासाठी गुजरात सरकारने मोठ्या निधीबरोबरच अफाट कल्पनाशक्तीही खर्च केली आहे, हे इथे आल्यावर जाणवते. इतके भव्य दिव्य स्मारक गुजरात सरकारने केवळ पाच वर्षांत बांधून पूर्ण केले आहे, हे निश्चितच कौतुकास्पद आहे,'' असेही संभाजीराजेंनी म्हटले आहे.

Sambhaji Raje Chhatrapati
`तुमची कमतरता नेहमीच जाणवेल`भाजप अजूनही बाळासाहेब ठाकरेंना विसरलेली नाही

जगातील सर्वात उंच पुतळा म्हणून 'स्टॅच्यू ऑफ युनिटी'चे उद्घाटन सरदार पटेल यांच्या जयंती दिवशी म्हणजेच ३१ ऑक्टोबर रोजी करण्यात आले आहे. गुजरातमधील नर्मदा जिल्ह्यातील सरदार सरोवराजवळ हा भव्य पुतळा उभारण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते १८२ मीटर उंच असलेल्या या पुतळ्याचे उद्घाटन करण्यात आले होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.