तर ही वेळ आलीच नसती.... ;संभाजीराजेंच सूचक वक्तव्य

Sambhajiraje Chhatrapati | राज्यात निर्माण झालेल्या परिस्थितीवर राजकीय वर्तुळासह जनसामान्यांचेही लक्ष आहे.
तर ही वेळ आलीच नसती.... ;संभाजीराजेंच सूचक वक्तव्य
Sambhajiraje Chhatrapati

मुंबई : "मला राज्यसभेची उमेदवारी दिली असती तर ही वेळ आलीच नसती. महाविकास आघाडीने मला जर राज्यसभेत पुरस्कृत पाठवलं असतं तर गेल्या १५ दिवसात झाल्या त्या घडामोडी घडल्या त्या दिसल्याच नसत्या. त्यामुळे आता जे कोणी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री होतील, त्यांनी सामान्यांची कामं करावी.” अशी प्रतिक्रीया संंभाजीराजे छत्रपती ( Sambhajiraje Chhatrapati/) यांनी दिली आहे. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे.

शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडानंतर राजकीय घडमोडींना वेग आला आहे. गेल्या ३० वर्षांतील शिवसेनेत (Shivsena) झालेले हे सर्वात मोठे बंड आहे. राज्यातील सर्व प्रमुख पक्षांतील नेत्यांच्या बैठकांवर बैठका सुरू आहेत. तर दूसरीकडे "आपल्याला ३५ नाही तर ४० शिवसेना आमदारांचा पाठिंबा आहे. आणखी १० आमदारही आपल्या सोबत येणार आहेत", असा दावा एकनाथ शिंदे यांनी केला आहे. तर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनीही एक ट्वीट केल्याने राज्यातील घडामोडींना वेग आला आहे, असे असतानाच आता संभाजीराजे छत्रपती यांनी सूचक वक्तव्य केलं आहे.

Sambhajiraje Chhatrapati
एकनाथ शिंदेंचा पहिला मास्टरस्ट्रोक; सुनील प्रभूंची मुख्य प्रतोदपदावरून उचलबांगडी

राज्यात निर्माण झालेल्या परिस्थितीवर राजकीय वर्तुळासह जनसामान्यांचेही लक्ष आहे. प्रत्येक घडामोड टिपली जात आहे. गेल्या ३० वर्षांतील शिवसेनेत (Shivsena) झालेले हे सर्वात मोठे बंड आहे. राज्यातील सर्व प्रमुख पक्षांतील नेत्यांच्या बैठकांवर बैठका सुरू आहेत. शिवसेनेने विधिमंडळ पक्षाची बैठक आज सायंकाळी ५ वाजता ठेवण्यात आली आहे. बैठकीचे पत्र बंडखोर आमदारांना पाठवण्यात आले आहे. त्या पत्राला एकाही बंडखोराने प्रतिसाद दिला नाही. त्यानंतर दुसरे पत्र पाठविले जाणार असल्याचीही माहिती आहे.

शिवसेनेचे विधीमंडळातील मुख्य प्रतोद सुनील प्रभू यांच्या सहीची ही नोटीस सर्व आमदारांना ई-मेल तसेच इतर समाजमाध्यमांद्वारे धाडण्यात आली आहे. गृह राज्यमंत्री शंभूराज देसाई यांना पाठवलेली नोटीस सोशल मीडियात व्हायरल झाली आहे. शिवसेनेकडून कारवाईचा बडगा उगारण्यात आला असला तरी किती आमदार या बैठकीला येणार, हे प्रश्नचिन्हच आहे. ही नोटिस आमदारांसाठी सूचक इशारा असल्याचेही मानले जात आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in