Abu Azmi
Abu AzmiSarkarnama

समाजवादी पक्षानं खिंडीत गाठलं! अबू आझमींकडून शिवसेनेची कोंडी

महाविकास आघाडीच्या आमदारांच्या बैठकीकडे समाजवादी पक्षाच्या आमदारांची पाठ

मुंबई : राज्यसभा निवडणुकीत (Rajya Sabha Election) महाविकास आघाडी विरुद्ध भाजप (BJP) असा सामना आहे. शिवसेनेच्या (Shivsena) उमेदवारासमोर भाजपच्या उमेदवाराचे आव्हान आहे. यामुळं राजकीय गोळाबेरजेला गती आली आहे. यातच आता समाजवादी पक्षानं (Samajwadi Party) नवीन तिढा निर्माण केला आहे. समाजवादी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष अबू आझमी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र लिहिलं आहे. या पत्राला उत्तर आल्यानंतर विचार करू, असं आझमींनी म्हटलं आहे. (Rajya Sabha Election News Updates)

महाविकास आघाडीच्या आमदारांची बैठक होत आहे. या बैठकीला न जाण्याचा निर्णय अबू आझमी यांनी घेतला आहे. आझमी यांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी फोनही केला होता. पण, आझमी यांनी फोनला उत्तर दिले नाही. भाजप नेत्यांकडूनही आझमी यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न सुरू आहे. यावर बोलताना आझमी म्हणाले की, शिवसेनेनं अडीच वर्षात आमच्यासाठी काय केलं. आमच्या मागण्या त्यांनी पूर्ण केल्या नाहीत. महाविकास आघाडीच्या आमदारांच्या बैठकीला आम्ही जाणार नाही.

आमच्या मागण्या आधी त्यांनी पूर्ण कराव्यात. अन्यथा आम्ही पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांच्याशी बोलून निर्णय घेऊ. मी एवढ्या वर्षापासून राजकारणात आहे, पण सत्तेचा लोभी नाही. मला मंत्री बनवा, असं मी म्हटलेलं नाही. आमच्या पत्राचं ऊत्तर येत नाही तोपर्यंत मी बैठकीला जाणार नाही. तसेच, आमच्या पक्षातील कुणीच या बैठकीला जाणार नाही. ऊद्धव ठाकरे यांनी धर्मनिरपेक्ष व्हावे. आम्ही धर्मनिरपेक्ष सरकारला पाठिंबा दिला होता. पण आत्ता शिवसेना धर्मनिरपेक्ष राहिली नाही, असेही आझमींनी म्हटलं आहे.

Abu Azmi
शिवसेनेच्या दुसऱ्या उमेदवाराचं काय होणार? जयंत पाटलांनी स्पष्टच सांगितलं

राज्यसभेच्या सहा जागांसाठी निवडणूक होत आहे. विधानसभेतील पक्षीय बलाबल पाहता भाजप 2 आणि काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेला प्रत्येकी एक जागा सहजपणे जिंकता येणं शक्यत आहे. सहाव्या जागेसाठी शिवसेनेकडून संजय पवार तर भाजपकडून धनंजय महाडिक तर मैदानात उतरले आहेत. शिवसेनेला आपला दुसरा उमेदवार निवडून आणण्यासाठी मित्रपक्षांसह अपक्षांची मदत लागणार आहे. यामुळं शिवसेनेची आक्रमक मोर्चेबांधणी सुरू आहे. राज्यसभा निवडणुकीत दगाफटका होऊ नये यासाठी शिवसेनेच्या सर्व आमदारांना मुंबईतल्या ट्रायडंट हॉटेलवर ठेवण्यात आलं आहे.

Abu Azmi
राष्ट्रवादीचं ठरलं; विधान परिषदेसाठी रामराजे निंबाळकर अन् खडसेंना संधी?

राज्यसभा निवडणुकीसाठी १० जूनला विधान भवनात मतदान होईल. त्यापूर्वी आमदार फुटू नयेत, यासाठी शिवसेनेच्या सर्व आमदारांना मुंबईत दाखल होण्याचे आदेश देण्यात आले होते. मुंबई येणाऱ्या शिवसेनेच्या सर्व आमदारांची ट्रायडंट हॉटेलमध्ये राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. सर्व आमदार १० जूनपर्यंत तेथे असतील. राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी भाजपकडून आमदारांची फोडाफोडी होऊ शकते, ही शक्यता गृहित धरुन शिवसेनेनं ही रणनीती आखली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com