UP Election 2022 : अखिलेश यादव यांनी केली राष्ट्रवादीच्या उमेदवाराची घोषणा

उत्तर प्रदेशमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने समाजवादी पक्षासोबत आघाडी केली आहे.
Sharad Pawar, Akhilesh Yadav, K. K. Sharma
Sharad Pawar, Akhilesh Yadav, K. K. SharmaSarkarnama

लखनौ : उत्तर प्रदेशात विधानसभा निवडणुकीचे (UP Election 2022) राजकारण चांगलंच तापलं आहे. भाजपसह (BJP) इतर पक्षांची उमेदवारांची नावं निश्चित करण्यासाठी खलबतं सुरू आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षही (NCP) उत्तर प्रदेशातील निवडणुकीच्या मैदानात उतरणार आहे. समाजवादी पक्षासोबत (SP) आघाडी केल्याची घोषणा पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी मंगळवारी केली आहे. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी राष्ट्रवादीच्या उमेदवाराची घोषणा करण्यात आली आहे.

राष्ट्रवादीचे राष्ट्रीय सरचिटणीस के. के. शर्मा (K. K. Sharma) हे निवडणुकीच्या मैदानात उतरणार आहेत. त्यांना अनूपशहर (Anupshahar) मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे. समाजवादी पक्षाकडून त्यांच्या उमेदवारीची घोषणा करण्यात आली आहे. राष्ट्रवादीचे उत्तर प्रदेश अध्यक्ष उमाशंकर यादव यांनी समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव (Akhilesh Yadav) यांच्याशी बुधवारी चर्चा केली. त्यानंतर के. के. शर्मा यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे.

Sharad Pawar, Akhilesh Yadav, K. K. Sharma
धक्कादायक : इच्छामरण हवंय...छत्तीसगडच्या मुख्यमंत्र्यांच्या वडिलांचं थेट राष्ट्रपतींना पत्र

समाजवादी पक्षाकडून राष्ट्रवादी एवढी एकच जागा मिळू शकते, अशीही चर्चा आहे. पण अद्याप याबाबत स्पष्टता नसून लवकरच उमेदवारांची पहिल्या टप्प्यातील यादी जारी केली जाऊ शकते. त्यावर आज किंवा उद्या शिक्कामोर्तब होईल, असे समजते. शर्मा यांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर आता राष्ट्रवादी आणकी किती जागा मिळणार, याबाबत उत्सुकता आहे. राष्ट्रवादी काँग्रेसप्रमाणे तृणमूल काँग्रेस व उत्तर प्रदेशातील इतर स्थानिक पक्षांनी समाजवादी पक्षाला साथ दिली आहे.

लवकरच समाजवादीचे प्रमुख अखिलेश यादव जागा वाटप जाहीर करतील, असे संकेत राष्ट्रवादीचे प्रवक्त नवाब मलिक यांनी दिले. या आघाडीमध्ये सुहेलदेव भारतीय समाज पार्टी, महान दल, राष्ट्रीय लोक दल, जनवादी पार्टी, प्रगतीशील समाजवादी पार्टी आणि अपना दल-कमेरावादी या पक्षांचा समावेश आहे.

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसकडून उत्तर प्रदेशसह मणिपूर व गोव्यात विधानसभा निवडणूक लढवली जाणार आहे. गोव्यात काँग्रेस व तृणमूलसोबत आघाडीसाठी बोलणी सुरू आहेत. उत्तर प्रदेशमध्ये यावेळी परिवर्तन होणार असल्याचे शरद पवार यांनी मंगळवारी सांगितले. भाजपचे तेरा आमदार फुटणार असल्याचा गौप्यस्फोटही त्यांनी केला होता. त्यानुसार आतापर्यंत भाजपच्या पाच आमदारांनी राजीनामा दिला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com