साकीनाका बलात्कार प्रकरण : पीडितेची मृत्युशी झुंज अखेर अपयशी

साकीनाका परिसरात घडलेल्या बलात्काराच्या घटनेमुळे राज्यभरात खळबळ उडाली आहे.
साकीनाका बलात्कार प्रकरण : पीडितेची मृत्युशी झुंज अखेर अपयशी
sakinaka victim dies in rajawadi hospital during treatment

मुंबई : साकीनाका (Sakinaka) परिसरात घडलेल्या बलात्काराच्या (Rape Case) घटनेमुळे राज्यभरात खळबळ उडाली आहे. या पीडितेचा उपचारादरम्यान रुग्णालयात मृत्यू झाला आहे. या पीडितेच्या गुप्तांगात लोखंडी रॉड घुसवल्याचा अमानवी प्रकारही समोर आला होता. या घटनेमुळे दिल्लीत निर्भया प्रकरणाच्या आठवणी पुन्हा एकदा ताज्या झाल्या आहेत. 

साकीनाका परिसरात घडलेल्या राज्यातील महिला सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. पीडितेला जखमी अवस्थेत उपचारासाठी घाटकोपरच्या राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. परंतु, आज तिची मृत्यूशी झुंज अखेर अपयशी ठरली. याप्रकरणी पोलिसांनी ४५ वर्षीय मोहन चौहानला अटक केली आहे. या घटनेवरुन विरोधकांनी राज्य सरकारला धारेवर धरले आहे. भाजप नेते देवेंद्र फडणवीस, प्रवीण दरेकर आणि चित्रा वाघ यांनी सरकारवर टीकेची झोड उठवली आहे. 

हा प्रकार एका टेम्पोमध्ये घडला होता. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले आहे. यात आरोपी मोहन चौहान हा पीडितेच्या शेजारी उभा असल्याचे दिसत आहे. साकीनाक्यातील या घटनेने दिल्लीत 2012 मध्ये घडलेल्या निर्भया प्रकरणाच्या आठवणी ताज्या झाल्या आहेत. दिल्लीत एका बसमध्ये महाविद्यालयीन तरुणीवर बलात्कार करुन तिच्या गुप्तांगात लोखंडी रॉड घुसवण्यात आला होता. या घटनेने संपूर्ण देशभरात खळबळ उडाली होती. 

मुंबईतील 9 सप्टेंबरला पहाटे ही बलात्काराची धक्कादायक घटना समोर आली होती. साकीनाका येथील खैरानी रोड परिसरात एक महिला बेशुद्धावस्थेत पडली होती. काल पहाटे याबाबत कंट्रोल रुमला कॉल आल्यानंतर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन त्या महिलेला घाटकोपरच्या राजावाडी  रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. नंतर महिलेवर बलात्कार करुन तिच्या गुप्तांगात रॉड घुसवल्याचा प्रकार समोर आला होता.  महिलेवर स्थिती खूपच गंभीर होती. अखेर उपचार सुरु असतानाच तिचा आज मृत्यू झाला.याप्रकरणी पोलिसांनी आरोपी मोहन चौहानला अटक केली असून, यात आणखी काही आरोपींची सहभागी असल्याचा संशय आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.