'साई रिसॉर्ट' हे अनिल परब यांच्याच मालकीचे; सोमय्यांनी पुरावेच दिले

Kirit Somaiya|CM Uddhav Thackeray| Anil Parab| मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि परिवहन मंत्री अनिल परब यांच्यात खोटं बोलण्याची स्पर्धा सुरु आहे.
'साई रिसॉर्ट' हे अनिल परब यांच्याच मालकीचे; सोमय्यांनी पुरावेच दिले
Kirit Somaiya

मुंबई : भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी पोलीस महासंचालक कार्यालय पोलीस महासंचालक रजनीश शेठ यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी दापोली साई रिसॉर्ट चे मालक अनिल परब यांच्या विरोधात फौजदारी कारवाई करण्याची मागणी केली आहे. यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना पुन्हा एकदा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि परिवहन मंत्री अनिल परब यांच्यावर निशाणा साधला आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि परिवहन मंत्री अनिल परब यांच्यात खोटं बोलण्याची स्पर्धा सुरु आहे. उद्धव ठाकरे हे माफिया सेनेचे माफिया मुख्यमंत्री आहेत, असा आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला आहे. दापोलीतील साई रिसॉर्ट हे अनधिकृत आहे. त्यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश केंद्रातील पर्यावरण मंत्रालय आणि महाराष्ट्र सागरी किनारा क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरणाने रत्नागिरी जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत.

Kirit Somaiya
Aimim : राज्यसभेसाठी एमआयएमचे दोन आमदार कुणाच्या पारड्यात मत टाकणार ?

या संदर्भात आम्ही दापोली पोलीस स्टेशन आणि रत्नागिरीच्या पोलीस अधीक्षकांकडे तीन वेळा तक्रार केल्या. दापोलीतील दोन रिसॉर्ट मालकांविरोधात पोलिस ठाण्यात तक्रारही दाखल केली. परंतु साई रिसॉर्टच्या मालकाविरुद्ध अजूनही तक्रार दाखल झाली नाही. त्यामुळे याची दखल घेऊन आपण तक्रार दाखल करावी आणि तात्काळ कारवाई करावी, अशी मागणी यावेळी सोमय्या यांनी केली.

तसेच, उद्धव ठाकरे हे माफिया सेनेचे माफिया मुख्यमंत्री आहेत, असा आरोप करत सोमय्यांनी केला आहे. अनिल परब म्हणतात, रिसॉर्ट आणि रिपोर्टशी माझा काही संबंध नाही. पण आज राज्याच्या महासंचालकांना आम्ही त्यासंबंंधीचे पुरावे दिले आहेत. साई रिसॉर्ट हे अनिल परब यांच्याच मालकीचे होते, यासंबंधीचे काही पुरावे मी पोलिसांना दिले आहेत. परब साई रिसॉर्टचे आरोप फेटाळत असले तरी विभास साठे यांच्याकडून खरेदी केल्याचाही पुरावा आहे. त्यामुळे गैरव्यवहार करून हे रिसॉर्ट बांधल्याची तक्रार केली आहे. याची पोलीस महासंचालकांना चौकशी करून कारवाई करावीच लागेल, असंही सोमय्यां यांनी म्हटलं आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in