मोठी बातमी : भावना गवळींच्या अडचणी वाढल्या; ईडीकडून कंपनीच्या संचालकास अटक

ईडीने गवळी यांच्या संस्थांवर धाडी टाकल्या होत्या.
Bhavana Gawli
Bhavana Gawlisarkarnama

मुंबई : भाजप नेते खासदार किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी यवतमाळ-वाशीमच्या शिवसेनेच्या खासदार भावना गवळी यांची (Bhawana Gawali) ईडीकडे तक्रार केल्यानंतर त्यांच्या अडचणींमध्ये सातत्याने वाढच होत आहे. भावना गवळी यांच्या कंपनीचे संचालक सईद खान यांना ईडीने अटक केली आहे. (Saeed Khan arrested by ED)

त्यामुळे हा भावना गवळी यांना मोठा धक्का मानला जात आहे. महिला उत्कर्ष ट्रस्ट चे कंपनीत रूपांतर करून गैरव्यवहार केल्याचार आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे. दरम्यान, या प्रकरणात खासदार गवळींना गैरप्रकार केला आहे. या ट्रस्टच्या मालकीची ७० कोटींची संपत्ती खासदार गवळींनी त्यांच्या पीएच्या नावावर केली असल्याचा गंभीर आरोपही सोमय्या यांनी केला होता. ईडीने गवळी यांच्या संस्थांवर धाडी टाकल्या होत्या. त्यानंतर आता सईद खान यांना अटक केली आहे.

Bhavana Gawli
पंकजा मुंडेंना मोठा धक्का; समर्थकांचा राष्ट्रवादीत प्रवेश

दरम्यान, या घडामोडींमुळे भावना गवळी यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. खासदार भावना गवळी यांच्या पाच शिक्षण संस्थांवर सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) छापे घातले आहे. भाजप खासदार किरीट सोमय्या यांनी केलेल्या तक्रारीनंतर ही कारवाई करण्यात आली आहे. भावना गवळी लवकरच तुरुंगात जातील, असा दावा सोमय्यांनी काही दिवसांपूर्वीच केला होता.

रिसोडनजीकच्या देगाव येथे खासदार गवळी यांचा बालाजी पार्टीकल बोर्ड हा कारखाना आणि भावना पब्लिक स्कूल व डीएमएलटी कॉलेज आहे. तर शिरपूरला वरिष्ठ महाविद्यालय आहे. या सर्वच ठिकाणी ईडीने छापे घातले. बालाजी पार्टीकल बोर्डमध्ये निश्‍चितच काहीतरी गौडबंगाल आहे. पण शाळा आणि महाविद्यालयांत तसे काहीही नसल्याचे शिवसैनिक सांगत आहे. केंद्रातील भाजप सरकार ईडीचा दुरुपयोग करीत असल्याचा आरोपही शिवसैनिक करीत आहेत. असे असले तरी ईडी कसून चौकशी करीत आहे.

Bhavana Gawli
जळगाव जिल्हा बँकेत राजकीय वैर विसरून खडसे, महाजन एकत्र!

सोमय्यांनी वाशीम गाठून या प्रकरणाची माहिती जाणून घेतली होती. त्यावेळी खासदार गवळींच्या कार्यकर्त्यांनी प्रचंड विरोध केला होता, त्यांच्यावर शाईसुद्धा फेकली होती. त्याचवेळी सोमय्यांनी गवळींना आव्हान दिले होते आणि ईडी, आरबीआयकडे तक्रार केली होती. सोमय्या यांनी गवळी यांच्यावर बालाजी पार्टीकल बोर्ड कारखान्यात १०० कोटींच्या घोटाळ्याचा आरोप केला आहे. भावना गवळींचा १०० कोटींचा घोटाळा. १८ कोटी रोख रक्कम काढणे, कार्यालयात ७ कोटी रोख ठेवणे, बॅंकांना फसविणे आदी आरोप सोमय्या यांनी केले आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com