BJP : साधूंच्या मारहाणीवरुन राजकारण पेटलं ; पालघरची आठवण करुन भाजपने केला आघाडी सरकारचा निषेध

ram kadam : "पालघर साधू हत्या प्रकरणात तत्कालीन 'फेसबूक' सरकारने त्यांच्यासोबत अन्याय केला.
sadhu beaten in sangli news update
sadhu beaten in sangli news updatesarkarnama

मुंबई : मुले पळवणारी टोळी समजून सांगली जिल्ह्यातील जत येथे चार साधूंना बेदम मारहाण (Sadhus Beaten Up in Sangli) करण्यात आली आहे. जत (Jath) तालुक्यातील लवंगा (Lavanga) गावात ही घटना घडली. सर्व साधू उत्तर प्रदेश (Uttar Pradesh) राज्यातील मथुरा (Mathura) येथील होते. यावरुन राज्यात राजकारणात पेटले आहे.

भाजपचे नेते राम कदम (ram kadam)यांनी याबाबत 'या घटनेत जे दोषी आहेत, त्यांच्यावर कठोर कारवाई व्हावी,' अशी मागणी केली आहे. ते माध्यमांशी बोलत होते. साधूंना मारहाण झालेल्या घटनेचा आम्ही निषेध व्यक्त करतो. महाराष्ट्र ही साधू-संतांची भूमी आहे. त्यांच्यासोबत होत असलेले असे प्रकार आम्ही सहन करणार नाही. या घटनेत जे दोषी आहेत, त्यांच्यावर कठोर कारवाई व्हावी, अशी मागणी कदम यांनी केली.

sadhu beaten in sangli news update
MNS : मुंबईत मनसे स्वबळावर लढणार : २२७ जागांवर उमेदवार उभे करणार

"पालघर साधू हत्या प्रकरणात तत्कालीन 'फेसबूक' सरकारने त्यांच्यासोबत अन्याय केला. मात्र, महाराष्ट्र सरकार साधूंवर अन्याय होऊ देणार नाही, असे म्हणत राम कदम यांनी तत्कालीन आघाडी सरकारवर टीका केली.

हे साधू कर्नाटक येथे ते देवदर्शनासाठी आले होते. देवदर्शन आटोपून पुढच्या तिर्थक्षेत्रासाठी ते निघाले असता त्यांच्यासोबत हा प्रकार घडला. गावातील तरुणाने दिलेल्या माहितीवरुन गैरसमज झाल्याने ग्रामस्थांचा गैरसमज झाला आणि त्यांनी साधूंना बेदम मारहाण केली. दरम्यान, गावातीलच काही सजग नागरिकांनी वेळीच मध्यस्थी केल्याने पालघर घटनेची पुनरावृत्ती टळली अशी माहिती स्थानिकांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in